गावात मुस्लिम समाजाची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. येथील मस्जिद जुनी झाल्याने तिचे नव्याने बांधकाम करण्यासाठी ॲड. मिर्झा मणियार, रफिक शेख, अझर पठाण आदी मुस्लिम कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. मस्जिदीचे बांधकाम करायचे; पण बांधकामाचा शुभारंभ परिसरातील सर्व समाजातील मान्यवरांच्या हस्ते करण्याचे ठरले. अखेर करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, शरद अकोलकर, राजेंद्र पाठक, प्रकाश शेलार, अमोल वाघ, अशोक टेमकर, भाऊसाहेब क्षेत्रे, जालिंदर वामन, नवनाथ आरोळे, सोन्याबापू दानवे, बाळासाहेब मोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मस्जिदीच्या बांधकामाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाला पाथर्डीचे तालुकाध्यक्ष नासीरभाई, नगरचे अब्दुल सलाम, हाजी नसीरभाई, हाजी इरफान भाई, बिलालभाई, इलियास सर, रफिक सर यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.