पळवे : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मंजूर रमाई घरकुलांचा भूमिपूजन समारंभ सरपंच विक्रमसिंह कळमकर व उपसरपंच वैशाली करंजुले यांच्या हस्ते पार पडला.
कळमकर म्हणाले, ‘मागासवर्गीय नागरिकांसाठी शासनाची रमाई आवास योजना हक्काचे घरकुल मिळवून देणारी आहे. गेल्या पाच वर्षांत या योजनेचा पाडळी रांजणगाव येथे मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे. रमाई व शबरी योजनेतून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यापुढेही असणार आहे.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब साठे, विठ्ठलराव साठे, ग्रामपंचायत सदस्य संगम साठे, शीतल औटी, अपेक्षा कळमकर, किरण साठे, वसंत जाधव, भाऊसाहेब उबाळे, अरुण उबाळे, गोवर्धन खेसे, राधू करंजुले, सत्यवान जाधव, वामन जाधव, समाधान जाधव, योगेश जाधव, दत्ता जाधव ग्रामसेवक एस. एस. गोसावी आदी उपस्थित होते.
----
१८ रांजणगाव
पाडळी रांजणगाव येथे रमाई आवास योजनेचा प्रारंभ करताना मान्यवर, ग्रामस्थ.