शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सुरक्षा पथकाची शिर्डीत अतिरेकी हल्ल्याची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 19:03 IST

साईनगरीसारख्या आंतरराष्ट्रीय व गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युतर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनएसजी) शिर्डीत सोमवारी सायंकाळी अचानक रंगीत तालीम केली.

शिर्डी : साईनगरीसारख्या आंतरराष्ट्रीय व गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युतर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनएसजी) शिर्डीत सोमवारी सायंकाळी अचानक रंगीत तालीम केली. ही तालीम दोन दिवस चालणार आहे.सोमवारी सायंकाळी पाच वाजता रंगीत तालमीला सुरूवात झाली. देशातील सर्वाधिक भाविक भेट देणारे ठिकाण म्हणून शिर्डी शहर समोर आले आहे़  वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् मध्येही शिर्डीची नोंद घेण्यात झाली आहे.  सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून एनएसजीच्या जवानांना एका हॉटेलवर दोरांच्या सहाय्याने उतरविण्यात आले. त्यानंतर  या जवानांनी हॉटेलमध्ये घुसून एका अतिरेक्याला कंठस्रान घातले. यानंतर ही सरावाची रंगीत तालीम असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. सोमवारी रात्री अकरा वाजेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत मंदिर परिसरात संकट व्यवस्थापनाचा सराव करण्यात येणार आहे. अचानक दहशतवादी हल्ला झाला, भाविकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले तर कसा प्रतिकार करायचा? याबाबत यावेळी सराव करण्यात येणार आहे़ या मोहिमेत मुंबई येथील राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे सव्वाशे जवान सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर श्वानपथक, बॉम्ब शोधणारे व नष्ट करणारे पथक, डॉक्टर्स आदींचा सहभाग आहे. यामुळे संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीही समोर येवून त्या दुरूस्त करता येवू शकतील, असाही उद्देश आहे़  नागरिकांना व भाविकांना या सराव मोहिमेचा त्रास होऊ नये म्हणून पथक विशेष काळजी घेत आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. मंगळवारी विमानतळावरही अशा प्रकारचा सराव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरAhmednagarअहमदनगर