शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

वाळूउपसा माहिती अधिकारात माहिती देण्यास नगरचे जिल्हाधिकारी-तहसील कार्यालयांची चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 17:07 IST

किती वाळू उचलली हे समजण्यासाठी उत्खननाच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा बसवून त्याचे फुटेज ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालयात देणे बंधनकारक आहे. याबाबत ‘लोकमत’ने माहिती अधिकारात माहिती विचारली असता, ती देण्याबाबत जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवून चालढकल करीत आहेत.

ठळक मुद्दे२०१५ पासून जिल्ह्यात अधिकृत लिलावांद्वारे जो वाळूउपसा झाला, त्या उत्खननाचे चित्रीकरण ‘लोकमत’ने जून २०१७ मध्ये माहिती अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितले होते. ‘लोकमत’ने सप्टेंबर २०१७ मध्ये राहुरी, अकोले, श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयांकडे ही माहिती मिळण्याबाबत अर्ज दिला.श्रीरामपूरची माहिती अद्याप आलेली नाही, तर अकोले तहसीलने ही माहिती आमच्या अभिलेख शाखेत उपलब्ध नाही, असे उत्तर दिले. राहुरी तहसीलकडून आलेल्या उत्तरात ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली असल्याचे म्हटले आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील वाळू उचलताना संबंधित ठेकेदाराने किती वाळू उचलली हे समजण्यासाठी उत्खननाच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा बसवून त्याचे फुटेज ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालयात देणे बंधनकारक आहे. याबाबत ‘लोकमत’ने माहिती अधिकारात माहिती विचारली असता, ती देण्याबाबत जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवून चालढकल करीत आहेत.शासनाच्या वाळू निर्गती धोरण २०१३ नुसार वाळूउपसा करताना प्रत्येक ठेक्यावर चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेरा व हॅलोजन लाइट असणे बंधनकारक आहे. वाळू उत्खनन होणारे ठिकाण, वाळू भरल्यानंतर वाहने जेथून बाहेर पडतात ते ठिकाण, या वाहनांना दिल्या जाणा-या पावत्या, वाहनांचे क्रमांक या सर्व बाबी सीसीटीव्हीमध्ये ठळकपणे दिसतील, अशा ठिकाणी कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. वाळू ठेकेदारांनी हे चित्रीकरण प्रत्येक आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयास व तहसील कार्यालयांस सीडीमध्ये किंवा पेनड्रॉइव्हमध्ये देणे बंधनकारक आहे. हे फुटेज नागरिकांनाही पाहण्यासाठी उपलब्ध राहील, असेही हा नियम सांगतो.जानेवारी २०१५ पासून जिल्ह्यात अधिकृत लिलावांद्वारे जो वाळूउपसा झाला, त्या उत्खननाचे चित्रीकरण ‘लोकमत’ने जून २०१७ मध्ये माहिती अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितले होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हे चित्रीकरणच उपलब्ध नाही. सदरची माहिती संबंधित तहसील कार्यालयांकडून प्राप्त करून घ्यावी, असे उत्तर गौण खजिन विभागाने दिले. त्यावर ‘लोकमत’ने सप्टेंबर २०१७ मध्ये राहुरी, अकोले, श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयांकडे ही माहिती मिळण्याबाबत अर्ज दिला. त्यातील श्रीरामपूरची माहिती अद्याप आलेली नाही, तर अकोले तहसीलने ही माहिती आमच्या अभिलेख शाखेत उपलब्ध नाही, असे उत्तर दिले. राहुरी तहसीलकडून आलेल्या उत्तरात ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली असल्याचे म्हटले आहे.म्हणजे जिल्हाधिकारी व तहसीलदार या माहितीबाबत टोलवाटोलवी करीत असल्याचे स्पष्ट होते. नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला चित्रीकरण देण्याची अट असताना या कार्यालयाकडे ते उपलब्ध का नाही? असा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या सांगण्याप्रमाणे तहसीलकडे माहिती मागितली, परंतु ती त्यांच्याकडेही नाही. मग माहिती आहे कोणाकडे? अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी पथके स्थापन केल्याचा दावा प्रशासन करते. परंतु ठेक्यांच्या चित्रीकरणाचा मूलभूत नियम जिल्हाधिकारी कार्यालयच पाळत नसल्याचे यातून समोर आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारी