शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

या गोष्टीवर सहकारमंत्र्यांनी बाळगले मौन....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 12:06 IST

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचेशी ‘लोकमत’ने तीनवेळा संपर्क केला. सुरुवातीला ते म्हणाले, याबाबत मला तपशील पाठवा. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या सर्व बातम्या व मुद्दे त्यांना अवलोकनासाठी पाठविले. मात्र, ते काहीच बोलले नाहीत. त्यानंतर दोनदा संपर्क करुनही काहीच उत्तर मिळाले नाही. सहकार आयुक्त कार्यालयाकडूनही तक्रारींवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. 

सुधीर लंके अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या नोकरभरतीतील संशयास्पद उत्तरपत्रिकांची सहकार विभागाने सरकारी संस्थेऐवजी खासगी एजन्सीकडून तपासणी करुन भरतीला क्लिनचीट दिली आहे. हा मुद्दा वादग्रस्त ठरला असताना सहकार विभाग याबाबत मौन धारण करुन आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचेशी वारंवार संपर्क करुनही ते या विषयावर प्रतिक्रिया देत नाहीत. 

राज्यातील सहकारी बँकांची भरती प्रक्रिया सातत्याने वादग्रस्त ठरत आहे. सांगली व सातारा या दोन जिल्हा सहकारी बँकांच्या भरती प्रक्रियेविषयी सन २०१६ व २०१७ साली तक्रारी झालेल्या आहेत. याच काळात नगर जिल्हा बँकेची ४६५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली. नगर बँकेच्या भरतीत काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांमध्ये संशयास्पद फेरफार दिसत आहेत या गंभीर आक्षेपावरुन सहकार विभागाच्या चौकशी समितीने ही भरती रद्द केली होती. मात्र, त्यानंतर भरतीतील काही उमेदवार उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने अशा ६४ उमेदवारांच्या संशयास्पद उत्तरपत्रिका सक्षम सरकारी एजन्सीकडून तपासून घेण्याचा आदेश दिला. सहकार विभागाच्या माजी आयुक्तांनी या उत्तरपत्रिका सरकारीऐवजी खासगी एजन्सीकडून तपासून घेतल्या व आपल्याच विभागाचा पूर्वीचा अहवाल मोडीत काढत भरती वैध ठरवली. 

हा वादग्रस्त निर्णय ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे. यासंदर्भात सहकार विभागाकडे नागरिकांनी तक्रारीही केल्या. मात्र, चौकशीस टाळाटाळ होताना दिसत आहे. मंत्री पाटीलही याबाबत उत्तर देत नाहीत. --

‘नायबर’ला महाविकास आघाडीचेही अभय सहकारी बँकांची भरती प्रक्रिया राबविण्यासाठीच्या पॅनलवर ‘नाबार्ड’ने ‘नायबर’ या संस्थेचे नाव राज्यात भाजप सरकारच्या काळात समाविष्ट केले. त्यानंतर या संस्थेने राबविलेली सांगली, सातारा, नगर बँकेची भरती वादग्रस्त ठरली. नगर बँकेच्या भरतीचे काम ‘नायबर’ ने घेतले व परस्पर अन्य एजन्सीला दिले. 

भरतीच्या कराराचा हा भंग असतानाही ‘नायबर’वर अद्याप कारवाई झालेली नाही. या संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्त कायद्यानुसार झाली असताना त्यांना बँकिंग भरतीचे अधिकार कसे दिले, हाही प्रश्न आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यातच बहुतांश सहकारी बँका असल्याने हे नेतेही या घोटाळ्यांबाबत मौन बाळगून आहेत. --‘नाबार्ड’चाही खुलासा नाही४‘नायबर’ या संस्थेने नगर जिल्हा बँक भरतीचे नियम पाळलेले नाहीत, तसेच ही धर्मादाय संस्था असताना तिला बँक भरतीचे अधिकार कसे? याबाबत ‘लोकमत’ने नाबार्डला लेखी विचारणा केली आहे. मात्र, नाबार्डने त्यावर उत्तर दिलेले नाही.