आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ८ - शासनमान्य आॅईल कंपन्यांनी शासकीय समितीच्या अहवालाची अंमलबजाणी न केल्याने खर्चात बचत करण्यासाठी रविवारी सप्ताहिक सुटट्टी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनच्या कुरूक्षेत्र येथील बैठकीत झाला होता़ अंमलबजावणीसाठीची दोन महिन्यांची मुदत संपली आहे़ या पार्श्वभूमीवर येत्या १४ मेपासून पेट्रोल पंप चालक रविवारी सप्ताहिक सुटी घेणार आहेत़ राज्यातील सर्व पेट्रोल पंप येत्या रविवारी बंद राहणार असल्याचे अहमदनगर ओम उद्योग समुहाचे संचालक तथा असोसिएशनचे पदाधिकारी बाळासाहेब पवार यांनी कळविले आहे़
१४ मे पासून रविवारी पेट्रोल पंप बंद
By admin | Updated: May 8, 2017 14:26 IST