शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणाचा डावा कालवा बंद; उजव्या कालव्यातून आवर्तन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:38 IST

मुळा धरणाचा डावा कालवा शनिवारी सकाळी बंद करण्यात आला. उजव्या कालव्यातून ११०७ क्युसेकसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. सद्यस्थितीत धरणात २१ हजार २९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे.

राहुरी : मुळा धरणाचा डावा कालवा शनिवारी सकाळी बंद करण्यात आला. उजव्या कालव्यातून ११०७ क्युसेकसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. सद्यस्थितीत धरणात २१ हजार २९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाच्या डाव्या कालव्याखाली ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरील पिके ओलीताखाली आली आहे़त. डाव्या कालव्याचे आवर्तन २१ दिवस सुरू होते. उजव्या कालव्यातून ३० हजार हेक्टरखालील पिके ओलिताखाली आले आहेत. उजव्या कालव्याखालील भरणे सुरू आहे. पुढील आठवड्यात कालवा बंद होण्याची शक्यता आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर समाधानकारक पाऊस पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून नदीपात्रातून पाणी सोडावे लागले होते. पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याव्दारे डाव्या व उजव्या कालव्याखालील क्षेत्र भरण्यात आले होते. दोन्ही कालव्याखाली असलेले तळेही पाण्याने भरण्यात आले होते. यंदा आणखी दोन आवर्तन शेतीसाठी मिळणार आहेत.मुळा धरणाच्या डाव्या कालव्याखालील भरणे पूर्ण झाल्याने शनिवारी आवर्तन बंद करण्यात आल्याची माहिती उपअभियंता विकास गायकवाड यांनी दिली. साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. उजवा कालव्याचे शेतीसाठी आवर्तन सुरू असून काही दिवसांनी बंद करण्यात येईल, असे मुळा धरण अभियंता आण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणDamधरण