शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महालावर स्वच्छता... गावात कचरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 10:42 IST

आपल्या भागातील पर्यटनस्थळे स्वच्छ असली पाहिजेत. पर्यटनस्थळावर कचरा होणार नाही, यासाठी प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या पाहिजेत.

सुदाम देशमुखअहमदनगर : आपल्या भागातील पर्यटनस्थळे स्वच्छ असली पाहिजेत. पर्यटनस्थळावर कचरा होणार नाही, यासाठी प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या पाहिजेत. जागोजागी कचरा कुंड्या ठेवल्या पाहिजेत. मात्र तसे न झाल्याने पर्यटक कुठेही कचरा टाकतात. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन फेकली जातात. त्यामुळे पर्यटनस्थळांचा परिसर गलिच्छ बनतो. त्यामुळे काही सामाजिक संघटना, तरुणांचे जथ्थे दर रविवारी महाल परिसरात जातात आणि स्वच्छतेची मोहीम घेतात. हे त्यांचे काम स्तुत्यच आहे. महालावरील स्वच्छता पटकन होते. सुका कचरा पटकन पोत्यात भरला की स्वच्छता मोहीम फत्ते होते. सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल होतात. त्याला वाहवाही मिळते. हे काम अतिशय चांगले आहे. मात्र महालाचा परिसर स्वच्छ करीत असताना गावातील स्वच्छतेचे कोण पाहणार? एखाद्या तरुणाच्या गल्लीत कचरा साठलेला असतो. मात्र तो गल्लीतला कचरा उचलण्याऐवजी तो थेट महालावरचा कचरा गोळा करतो. महाल परिसरात कचरा होणार नाही ही जशी काळजी घेतली जाते, तशी गल्लीत कचरा झाला नाही पाहिजे, याची काळजी कोणीच घेताना दिसत नाही. शहरातील कचरा साफ झाला पाहिजे, याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. ही महापालिकेची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच नागरिकांची देखील आहे.सामाजिक संस्था, तरुणांचे ग्रुप आणि इतर स्वच्छता प्रेमींनी नगरमध्येही स्वच्छता करावी. अगदी शाळांच्याभोवती कचरा कुंड्या ओसंडून वाहतात. आपण राहतो, अशा ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. कुंड्यांच्याबाहेर कचरा पडलेला असतो. लोक कचरा गाडीवरूनच फेकतात. कुंडीजवळ येतात आणि कुंडीत टाकण्याऐवजी कुंडीच्याबाहेर कचरा फेकला जातो. तो कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे एक पाऊल पुढे जाऊनच लोकांनी कचरा फेकला पाहिजे. नाल्यातही प्लास्टिकच्या पिशव्यांमधून कचरा फेकला जातो. त्यामुळे नाल्या तुंबल्या जातात.महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचाही कारभार ढिसाळ आहे. नियोजन, व्यवस्थापनाअभावी कचरा जागेवरच पडून असतो. आता दोनवेळा साफसफाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र तो कायमस्वरुपी टिकण्याची शक्यता अजिबात वाटत नाही. त्यालाही कामगार युनियनकडून नेहमीच विरोध केला जातो. कचरा संकलनासाठी अपुरी साधन-सामुग्रीची नेहमीच चर्चा झडते. स्वच्छतेसाठी १४ व्या वित्त आयोगातून मिळालेला निधी तसाच पडून असतो, ही एक शोकांतिकाच! शेवटी शहर स्वच्छ झाले पाहिजे, ही ओढ महत्त्वाची आहे. त्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आले तरच शहर स्वच्छ होईल. केवळ स्वच्छतेच्या स्पर्धेत क्रमांक मिळवून गल्लीतले कचऱ्याचे ढीग कमी होणार नाहीत. केवळ कागदावर स्वच्छता असून उपयोग नाही, हेही थोडे महापालिकेने लक्षात घेतले पाहिजे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर