पळवे : गेल्या सहा वर्षांपासून मारुतीच्या मंदिरात भरणारी पारनेर तालुक्यातील घाणेगाव जिल्हा परिषदेची शाळा आता हक्काच्या वर्गखोल्यांत भरणार आहे. नुकताच या शाळेच्या वर्गखोल्यांच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची इमारत वापरायोग्य नसल्याने चक्क मारुतीच्या मंदिरात शाळा भरविण्याची वेळ प्रशासनावर आली होती. तब्बल सहा वर्षे ही शाळा मारुती मंदिरातच भरत होती. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून शाळेला इमारत मिळण्यासाठी ग्रामस्थांसह पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत घाणेगाव येथे ८ लाख ७५ हजार रुपये खर्चाच्या शाळाखोल्यांचे काम नुकतेच सुरू करण्यात आले.
यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, सरपंच दादाभाऊ शेलार, उपसरपंच विद्द्या मनोहर शिंगोटे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश शिंगोटे, प्रियांका परांडे, विशाल वाबळे, उषा शिंदे, निकिता वाबळे, ग्रामसेविका वैशाली औटी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जांबे, लक्ष्मण परांडे, गणेश वाबळे, शैलेश परांडे, मनोहर शिंगोटे, सुदाम वाबळे, सौरभ वाबळे, पवन वाबळे, अमोल वाबळे, काका वाबळे, प्रकाश वाबळे, कचरू शिंदे, तुकाराम म्हस्के, सुनील वाबळे, चांगदेव म्हस्के, राजेंद्र शिंदे, गोरख शिंगोटे, सागर वाबळे, गंगाराम म्हस्के उपस्थित होते.