शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवाणखाना बंद करण्यावरुन जामखेडमध्ये कलाकेंद्र चालकांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 18:54 IST

तालुक्यातील मोहा शिवारात बीड रस्त्यावर टाकलेला दिवाणखाना मोहा ग्रामस्थांनी रद्द करावा, असे का म्हणाला यावरून दोन कलाकेंद्र चालकांमध्ये फोनवरून शिविगाळ, दमदाटी करण्यात आली. व १० जून रोजी रात्री एकच्या सुमारास घुंगरू कलाकेंद्रावर झोपलेल्या कलाकेंद्र चालकास पाच जणांनी मारहाण करून त्याच्या दोन बहिणींचा विनयभंग केला, अशी तक्रार एका कलाकेंद्र चालकाने दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जामखेड : तालुक्यातील मोहा शिवारात बीड रस्त्यावर टाकलेला दिवाणखाना मोहा ग्रामस्थांनी रद्द करावा, असे का म्हणाला यावरून दोन कलाकेंद्र चालकांमध्ये फोनवरून शिविगाळ, दमदाटी करण्यात आली. व १० जून रोजी रात्री एकच्या सुमारास घुंगरू कलाकेंद्रावर झोपलेल्या कलाकेंद्र चालकास पाच जणांनी मारहाण करून त्याच्या दोन बहिणींचा विनयभंग केला, अशी तक्रार एका कलाकेंद्र चालकाने दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मोहा हद्दीतील घुंगरू कलाकेंद्राचा चालक विशाल जाधव याने फिर्याद दिली. शनिवार दि. ९ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास घुंगरू कलाकेंद्रावर असताना अनिल विश्वनाथ पवार (रा. कान्होपात्रा नगर जामखेड) फोन करून म्हणाला, आमचे पाव्हणे संतोष पवार यांनी टाकलेला दिवाणखाना मोहा ग्रामस्थांनी रद्द करावा असे का म्हणाला व फोनवरून शिविगाव करुन दमदाटी केली. यावर मी काही केले नाही असे म्हणालो असता पवार याने फोनवर आम्ही तुला बघून घेतो असे म्हणाला.रविवार दि. १० रोजी रात्री एकच्या सुमारास फिर्यादी विशाल जाधव त्याच्या घुंगरू कलाकेंद्रावर झोपलेला असताना अनिल विश्वनाथ पवार, रोहित अनिल पवार, आकाश लिलावती चंदन, बबन बन्सी चंदन, अजय रंजना चंदन (सर्व रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) हे या ठिकाणी आले व फिर्यादी विशाल जाधव यास मारहाण करण्यास सुरवात केली. यापैकी आकाश चंदन व रोहित पवार यांनी काठीने डोके व पायावर मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या दोन बहिणी भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता अनिल पवार व बन्सी चंदन यांनी त्यांचा विनयभंग केला. यावेळी झालेल्या झटापटीत बहिणींच्या गळ्यातील गंठण गहाळ झाले. अशी फिर्याद घुंगरू कलाकेंद्राचे चालक विशाल जाधव यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड