शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नगर अर्बनच्या दंडाबाबत जबाबदार असणा-यांवर कारवाई करणार; प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 12:00 IST

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील नगर अर्बन को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ४० लाख रुपयांचा  दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या पत्राबाबत विधी सल्लागाराचे मत घेऊन संचालक मंडळ किंवा अधिकारी यांना नोटिसा दिल्या जातील. यामध्ये जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

अहमदनगर : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील नगर अर्बन को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेला रिझर्व्ह बँकेने ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या पत्राबाबत विधी सल्लागाराचे मत घेऊन संचालक मंडळ किंवा अधिकारी यांना नोटिसा दिल्या जातील. यामध्ये जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे नगर अर्बन बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आरबीआयचे संबंधित पत्र विधी सल्लागारांना देण्यात आले आहे. त्यांचा सल्ला काय येतो, ते पाहणे महत्त्वाचे असेल. संचालक मंडळ किंवा अधिकारी यांना नोटिसा पाठविण्याबाबत सल्ला मिळाला तर त्यापद्धतीने कार्यवाही केली जाईल. नोटिसानंतर त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. त्यानंतर जबाबदारी निश्चित होईल आणि संबंधितांकडून दंड वसूल केला जाईल. दंड करण्यापूर्वी आरबीआयच्या अधिकाºयांकडे शिष्टाई केली. प्रशासक नियुक्ती, बँकेची स्थिती आणि कोरोना लॉकडाऊनमुळे बँकेचे काही प्रमाणात होत असलेले नुकसान याबाबत आरबीआयला माहिती दिली. मात्र काही ना  काही दंड करणे क्रमप्राप्त असल्याने दंडमाफी होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. 

दंड भरण्यासाठी १४ दिवसांची मुदतआरबीआयने ४० लाख रुपयांचा दंड भरण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिलेली आहे.  १४ दिवसांमध्ये ही रक्कम भरावीच लागणार आहे. ती रक्कम नंतर कोणाकडून वसूल करायची ते जबाबदारी निश्चितीनंतर ठरेल. मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा शिष्टाई करून दंडमाफीबाबत प्रयत्न केले जातील. बँकेची वस्तुस्थिती आरबीआयसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल,असे मिश्रा म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्रfraudधोकेबाजी