अहमदनगर : तापमानाचा पारा घसरला असून अहमदनगरमध्ये किमान तापमान १० अंशावर आले आहे. त्यामुळे नगर चांगलेच गारठले आहे. नगर शहरातील अनेक भागांत शेकोट्या पेटल्या असून ऊबदार कपडे वापरून लोक थंडीपासून बचाव करीत आहेत. तसेच सकाळच्या थंडीतही लोक फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.
यंदा दिवाळीमध्ये थंडी नव्हती. दिवाळीनंतर किंचित थंडीला सुरुवात झाली. तामिळनाडूमध्ये आलेले निवार चक्रीवादळ आणि पावसाने राज्यात गार वारे पसरले. त्यामुळे थंडीमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर आठवडाभर गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन झाले आहे. दोन दिवसांपासून तापमानाचा पारा हळूहळू घसरला. त्यात शनिवारी रात्री तापमानाचा पारा १० अंशावर आला आहे. त्यामुळे थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. थंडीमध्ये वाढ होत असल्याने सायंकाळी सातनंतर रस्त्यावरील वर्दळ कमी झालेली दिसते. नागरिक ऊबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत.
---------------
फोटो- ०६ पाईपलाईन रोड
पाईपलाईन रोडवरील एका दुकानात ऊबदार कपडे घेण्यासाठी रविवारी नागरिकांची गर्दी होती.
--
(दोन कोट आहेत)