शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही नगर शहरात बहरली आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:53 IST

तीव्र दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतीपिके व फळबागा नष्ट झालेल्या असताना नगर शहरात मात्र घरोघरी आमराई बहरली आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : तीव्र दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतीपिके व फळबागा नष्ट झालेल्या असताना नगर शहरात मात्र घरोघरी आमराई बहरली आहे़ घरासमोरील झाडांना लगडलेले आंबे सध्या लक्ष वेधून घेत आहेत़ यंदा निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ आहे़ लवकर पाऊस पडला नाही तर दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार आहे़ नगरकरांनी घरासमोर लावलेली आंब्याची झाडे दुष्काळातही मुलांसारखी वाढविल्याने त्याचे फळ आता त्यांना मिळत आहे़ हलक्या प्रतिच्या आणि मुरमाड जमिनीत आंब्याची झाडे चांगल्या प्रकारे वाढतात़ साधारण पाच ते सहा वर्षांत या झाडांना फळे येतात़ शहरातील बहुतांश परिसरातील जमीन ही हलक्या प्रतिची आहे़ त्यामुळे सारसनगर, केडगाव, बुरुडगाव रोड, सावेडी परिसर, बोल्हेगाव, नागापूर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे दिसतात़ घरोघरी एक किंवा दोन आंब्याची झाडे आहेत़ विशेष म्हणजे यंदा वादळाचा फटका न बसल्याने बहरलेल्या आंब्याची गळती झाली नाही़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत.हापूस, केशर, कलमी, गावरान आंब्याची झाडेनगरमध्ये घरासमोर इतर फळझाडांसह हापूस, केशर, कलमी व गावरान आंब्याची झाडे दिसतात़ गावरान आंब्याचे झाड मोठ्या प्रमाणात वाढते त्याचे फळ आकाराने लहान व खाण्यास गोड असते़ नगरकरांच्या या वृक्षप्रेमामुळे शहरातील अनेक परिसर हिरवाईने नटलेले दिसतात़नगर शहर परिसरात तसे पावसाचे प्रमाण कमी असते़ मात्र घरगुती वापराच्या पाण्यावर आंब्याची झाडे चांगली येतात़ या झाडांना अपेक्षित जमीन असल्याने झाडांची वाढ लवकर होऊन रोगाचाही प्रादुर्भाव होत नाही़ त्यामुळे नगरमध्ये बहुतांश ठिकाणी घरासमोर मोठमोठी आंब्याची झाडे निदर्शनास येतात़ -पंडित लोणारे, कृषीतज्ज्ञ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर