शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात पन्नास लाख लोकसंख्येसाठी अवघे सव्वातीन हजार पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 14:47 IST

तब्बल ५० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सद्यस्थितीला अवघे ३ हजार २४० इतके पोलीसबळ आहे. अपुरे पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नगर जिल्ह्यातील कायदा आणि  सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येथील पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.

अरुण वाघमोडे । अहमदनगर : क्षेत्रफळाने राज्यात सर्वाधिक मोठा आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्याची २०११ च्या जणगणनेनुसार ४५ लाख ४३ हजार १६९ इतकी लोकसंख्या आहे. गेल्या दहा वर्षांत ही लोकसंख्या पाच ते सहा लाखांनी वाढल्याचा अंदाज आहे. म्हणजेच तब्बल ५० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात सद्यस्थितीला अवघे ३ हजार २४० इतके पोलीसबळ आहे. अपुरे पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि  सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येथील पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.पोलीस प्रशासनाच्यावतीने सध्या रेझींग डे सप्ताह (महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन) साजरा केला जात आहे. २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. गेल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात पोलीस दलात गरजेनुसार आवश्यक ते बदल करण्यात आले. नगर जिल्ह्यात मात्र अपवाद वगळता गरजेप्रमाणे पोलीस दल सक्षम करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. सध्याची लोकसंख्या आणि पोलिसांच्या संख्येची तुलना केली तर १५५० लोकसंख्येमागे अवघा एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. जागतिक स्तरावर साधारणत: २०० लोकांमागे एक पोलीस असावा असे प्रमाण आहे. महाराष्ट्रात ३०० ते ३५० लोकांमागे एक पोलीस कार्यरत असणे असे प्रमाण आहे. नगर जिल्ह्यात मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्याच्या तुलनेत नगरमध्ये गुन्हेगारींचे प्रमाण दोन ते तीनपट अधिक आहे. या जिल्ह्यात मात्र नगरच्या तुलनेत पोलीस आणि पोलीस ठाण्यांचीही संख्या जास्त आहे. पोलीस स्टेशनचे प्रस्ताव प्रलंबित जिल्ह्यात सध्या सायबर पोलीस स्टेशन धरून ३१ पोलीस ठाणे आहेत.  तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व ईशू सिंधू यांनी जिल्ह्यात नव्याने बारा पोलीस ठाणे व्हावेत यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. यावर मात्र अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.    आयुक्तालयासाठी पाठपुरावा नाही जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेत नगरमध्ये पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव नऊ वर्षांपूर्वी गृहविभागाला सादर करण्यात आलेला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या बदलीनंतर याचा सर्वांना विसर पडला. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरूनही आयुक्तालयासाठी पाठपुरावा झालेला दिसत नाही़.गुन्ह्यांचे तपास रखडले अपुºया पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, निवडणुका, सण, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, धार्मिक स्थळांच्या जत्रा-यात्रा हे सर्व संभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी निभावतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातून जिल्ह्यातील अनेक महत्त्वांच्या गुन्ह्यांचा तपास रखडल्याचे दिसत आहे.

 जिल्ह्याचा विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेत येथे मनुष्यबळाची कमतरता आहे़ जिल्ह्यात नव्याने बारा पोलीस स्टेशन व्हावेत तसेच इतर सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे़ सध्या उपलब्ध आहे ते मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या माध्यमातून कामाचे नियोजन करण्यात आले आहे, असे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी सांगितले.      

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसForceफोर्स