शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना मिळणार एका क्लीकवर सातबारा : कीआॅस्क प्रणाली होणार कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 17:00 IST

जमिनीचा सातबारा, आठ अ, फेरफार हे सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शब्द. कारण प्रत्येक वेळी त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ही कागदपत्रे हवी असतात.

अहमदनगर : जमिनीचा सातबारा, आठ अ, फेरफार हे सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शब्द. कारण प्रत्येक वेळी त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ही कागदपत्रे हवी असतात. त्यासाठी मग अर्ज करावा लागायचा अन् काही दिवस वाट पाहावी लागायची. आता जिल्हा प्रशासनाने किआॅस्क प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतल्याने हे चित्र बदलणार आहे. केवळ एका क्लीकवर कोणत्याही नागरिकांना त्यांना हवी असणारी ही कागदपत्रे मिळू शकणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून ही सुविधा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होत आहे.या किआॅस्क प्रणालीचा शुभारंभ शनिवार (दि.15 जून) रोजी दुपारी १२ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.जमिनीचा सातबारा, आठ अ खाते उतारा, कडईपत्रक, जन्म मृत्यूनोंदी, इनामपत्रक आदी दस्तावेज हे शेतकरी व इतर नागरिकांसाठी महत्वाचे असतात. विविध कामकाजासाठी त्यांनी ही कागदपत्रे हवी असतात. ही महत्वाची कागदपत्रे हवी असली की, त्यांच्या नकला मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतरही काही दिवस वाट पाहावी लागायची. त्यामुळे निकड असलेल्या नागरिकांना आता किआॅस्क प्रणालीमुळे ही कागदपत्रे तात्काळ मिळणे सुलभ होणार आहे. सन 1930 पासून ते सन 2013 पर्यंतची तब्बल पावणेदोन कोटी कागदपत्रांचे (जुने अभिलेख) स्कॅनिंग त्यासाठी करण्यात आले असून तो डाटा या प्रणालीत साठवण्यात आला आहे. यात जुने गट नंबर आणि जुने सर्वे नंबर उपलब्ध आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील श्रीगोंदा-पारनेर उपविभाग कार्यालयाच्या नजिक या किआॅस्क प्रणालीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. अगदी एटीएम मशीनप्रमाणेच याची रचना आहे. कीआॅस्क प्रणालीच्या स्क्रीनवर नागरिक त्यांना हव्या त्या माहितीवर क्लीक करुन ती कागदपत्रे मिळवू शकतील. केवळ वीस रुपयांत ही कागदपत्र त्यांना मिळू शकतील. एखाद्या नागरिकाला सातबारा हवा असेल तो स्क्रीन वर 7/12चा पर्याय क्लीक करेल. त्यानंतर तहसील, गाव, सर्वे नंबर आणि हिस्सा नंबर ही माहिती भरली की प्रिंटरवर क्लीक करुन सातबाराची डिजीटल प्रिंट त्यांना दिसेल. ही प्रणाली एटीएम मशीन सारखीच काम करते. मशीनवरील कॅश रिसीव्हर मध्ये दहा रुपयांच्या दोन किंवा वीस रुपयांची एक नोट टाकली की नागरिकांना हव्या असलेल्या दस्तावेजाची प्रत त्यांना मिळणार आहे.निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, तहसीलदार (महसूल) सुधीर पाटील आणि महसूल शाखेतील अधिकारी-कर्मचा-यांनी ही किआॅस्क प्रणाली कार्यरत करण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत.ही किआॅस्क प्रणाली कोणत्याही नागरिकांना हाताळण्यासाठी अतिशय सोपी आहे. कारण, यासाठी कोणतेही स्वतंत्र असे लॉगिन करावे लागत नाही. सोप्या पद्धतीने दस्तावेज प्राप्त होतो, त्यासाठी सेवा देणा-याला अतिरिक्त शुल्क मोजावे लागत नाही. नागरिकांच्या वेळेची बचत होते. त्यांना तात्काळ हवा तो दस्तावेज मिळू शकतो. हाताळण्यास सोपी प्रक्रिया असल्याने प्रशिक्षणाची आवश्यकता भासत नाही. सातबारा, फेरफार, कडई पत्रक, जन्म मृत्यू नोंदी अशा पाच प्रकारचे दस्तावेज नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. तर नगर तालुक्यातील नागरिकांना वरील दस्तावेजासोबत इनामपत्रकही या प्रणालीद्वारे काढता येतील. ही कार्यप्रणाली अतिशय सुलभ असून एकूण किती दस्तावेज काढले गेले आणि किती रुपयांचा व्यवहार झाला, याची माहितीही तारखेनिहाय उपलब्ध होते. या प्रणालीमध्ये इतर सेवा उपलब्ध करुन द्यायच्या असल्यास तसे बदलही करता येतात, हे या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय