शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आत्मदहनाचा इशारा देणा-या नगरसेवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:39 IST

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामे मंजूर करूनही प्रभाग दोन व बारामधील विकासकामे होत नसल्याने डिगांबर चव्हाण, पवनराजे राळेभात व अमित जाधव या नगरसेवकांनी बुधवारपासून नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले.

जामखेड : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामे मंजूर करूनही प्रभाग दोन व बारामधील विकासकामे होत नसल्याने डिगांबर चव्हाण, पवनराजे राळेभात व अमित जाधव या नगरसेवकांनी बुधवारपासून नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले. चव्हाण यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे पोलिसांनी त्यांना उपोषण स्थळावरून अटक करून न्यायालयात हजर केले. तसेच १४ दिवस स्थानबद्ध करण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने ही मागणी फेटाळल्याने चव्हाण यांना सोडून दिले. त्यामुळे ते पुन्हा उपोषणास बसले आहेत.या नगरसेवकांनी पालिकेस अनेकदा लेखी व तोंडी सूचना देऊन २७ आॅगस्ट २०१८ रोजी उपोषण केले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने बुधवारपासून त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. प्रभाग दोन व बारा मधील रस्त्याचे, भूमिगत गटारीची कामे सुरू करावीत, नगरपालिकेची कामे सुरू असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावणे, कामाला मुदतवाढ देऊनही काम केले नाही अशा एजन्सीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणे, निकृष्ठ कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तपासणी करावी अशा या नगरसेवकांच्या विविध मागण्या आहेत.पालिकेचे सत्ताधारी मनमानीपणे वागत असून विरोधी नगरसेवकांना त्यांच्या हक्काचा निधी देत नाहीत. पालकमंत्री राम शिंदे जाणूनबुजून विरोधी नगरसेवकांना त्रास देतात. पालकमंत्री पालिकेच्या विकास कामांचे भूमिपूजन दिवसा न करता रात्री करतात. त्यामुळे त्यांना शहरातील रस्त्यांवरील खड्डे, धूळ दिसत नाही. पालिकेचे बाजारीकरण झाले आहे. यापुढील काळात पालकमंत्र्यांना वेगळ्या भाषेत उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी दिला.चव्हाण यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी चव्हाण यांना अटक करून न्यायालयात हजर केले. चव्हाण उपोषणास बसले असून ते कधीही आत्मदहन करतील, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. प्रभागातील कामांसाठी ते उपोषणास बसले असून आत्मदहन करण्याचा त्यांचा विचार नाही. याबाबत पोलिसांना एक दिवस अगोदर लिहून दिले आहे. सत्ताधारी त्यांचे उपोषण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पोलिसांची १४ दिवस स्थानबद्धतेची मागणी अयोग्य असून ती फेटाळावी, अशी विनंती अ‍ॅड. हर्षल डोके यांनी चव्हाण यांच्यातर्फे केली. न्यायालयाने ती मान्य करून चव्हाण यांना सोडून दिले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड