शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वाळूंज बाह्यवळण रस्त्यासाठी नागरिकांचा रास्तारोको; १५ दिवसात काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:20 IST

वांळूज बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने मार्गा लावावे, या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२८) सकाळी साडेनऊ वाजता वांळुज येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले.

निंबळक : वांळूज बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने मार्गा लावावे, या मागणीसाठी नगर-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी (दि.२८) सकाळी साडेनऊ वाजता वांळुज येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. १५ दिवसाच्या आत रस्त्याचे काम सुरू होईल. त्यावर दररोज पाणी मारले जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.नगर-सोलापूर महामार्गावरील वांळुज (ता.नगर) ते नगर-मनमाड बाह्यवळण रस्ता आहे. विळदपासून वांळुजच्या शिवारापर्यत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले. मात्र वांळुज येथील बाह्यवळण रस्त्यालगत असणा-या वस्तीजवळ हे काम येऊन थांबले. ठेकेदाराने काम बंद केल्यामुळे हा रस्ता रखडला आहे. दीड किलोमीटरच्या रखडलेल्या रस्त्यालगत नागरिकांची घरे, शेती आहे. या रस्त्यावरील धुळीमुळे शेतक-यांच्या पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धुळीमुळे आजाराचे प्रमाण वाढलेले. हा रस्ता तत्काळ दुरुस्ती करावा, याबाबतचे निवेदन महादेव शेळमकर व ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे वांळुज येथील ग्रामस्थांनी सोलापूर महामार्गावरशुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता आंदोलन केले.  यावेळी महिलांनी मालवाहतूक गाडया अडवल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना घेराव घालून हा रस्ता तातडीने मार्गा लावण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी सरपंच लताबाई महादेव शेळमकर, संतोष म्हस्के, बाळासाहेब दरेकर, महादेव शेळमकर, राजेंद्र  कडिले, सुखदेव दरेकर, संदीप मोरे, कुंदन शिंदे, अनिल मोरे, बाजीराव दरेकर, विजय शेळमकर, रावसाहेब शिंदे, सोमनाथ जाधव, नवनाथ हिंगे ,भरत दरेकर, वैभव सपाटे, लंकाबाई दरेकर, शोभा दरेकर, शंकुतला हिंगे ,सरस्वती दरेकर, अलका शिंदे, चंदाबाई जाधव, महंमद पठाण, बाळासाहेब कोल्हे, मोहन दरेकर, आकाश जाधव, संतोष गायकवाड, विजय हिंगे, कुंडलिक दरेकर उपास्थित होते.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षा