शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईहून आलेल्या नागरिकांकडून कुरणच्या ग्रामसेवकाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 18:47 IST

मुंबईतील घाटकोपरहून कुरण (ता़ संगमनेर) येथे आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याचा राग मनात धरून ग्रामसेवकाला पुन्हा दुसऱ्यांदा शुक्रवारी (३ जुलै) शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली.

संगमनेर : मुंबईतील घाटकोपरहून कुरण (ता़ संगमनेर) येथे आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याचा राग मनात धरून ग्रामसेवकाला पुन्हा दुसऱ्यांदा शुक्रवारी (३ जुलै) शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन अल्पवयीन मुले तर दोन महिलांचाही समावेश आहे.जाकीर समशेर शेख, जहागीर शामीर शेख, जमशेद शामीर शेख, शाहीन जाकीर शेख, यास्मीन समशेर शेख, वसीम समशेर शेख, कय्युम महम्मद हुसेन शेख ( सर्व रा. घाटकोपर, मुंबई, हल्ली रा.कुरण, ता.संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गंगाधर चंद्रभान राऊत असे कुरण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे नाव असून त्यांना दुसऱ्यांदा शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ, धक्काबुक्की करण्यात आली.११ जूनला जाकीर समशेर शेख व त्याच्या कुटुंबातील लोक मुंबईतील घाटकोपरहून कुरण गावात आल्याची माहिती ग्रामसेवक राऊत यांना मिळाली होती. ग्रामसेवक राऊत यांनी जाकीर शेख याच्या घरी जात त्याला व त्याच्या कुटुंबातील २२ लोकांना गावातील जिल्हा परिषद शाळेतील संस्थात्मक विलगीकरण कक्षात दहा दिवस व त्यानंतर पुढील सात दिवस घरी राहण्याची समज दिली होती. याचा जाकीर शेख याला राग आल्याने त्याने राऊत यांच्या मोबाईलवर फोन करीत त्यांना शिवीगाळ करीत धमकी दिली. ग्रामपंचायतीसमोरही त्यांना शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी राऊत यांनी २६ जूनला त्याचेविरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला़ पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर