शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

आरोग्यसेविकांच्या अंगावर धावून आले नागरिक; मुकुुंदनगर येथील प्रकार, दोन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:03 IST

कोरोना साथीच्या संदर्भात शहरातील मुकुंदनगर परिसरात माहिती संकलित करीत असलेल्या आरोग्यसेविकांना सोमवारी (दि.३० मार्च) सकाळी काही नागरिकांनी दमदाटी त्यांच्या अंगावर धावून गेले. या घटनेची पोलिसांनी तत्काळ दखल घेत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 

अहमदनगर : कोरोना साथीच्या संदर्भात शहरातील मुकुंदनगर परिसरात माहिती संकलित करीत असलेल्या आरोग्यसेविकांना सोमवारी (दि.३० मार्च) सकाळी काही नागरिकांनी दमदाटी त्यांच्या अंगावर धावून गेले. या घटनेची पोलिसांनी तत्काळ दखल घेत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. नगरमध्ये रविवारी आणखी दोन करोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. हे रुग्ण नगरमध्ये असताना मुकुंदनगर भागात राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा परिसर प्रशासनाने तातडीने सील केला केला आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळपासून आरोग्यसेविकांच्या मार्फत मुकुंदनगर परिसरात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात कुटुंबात कुणाला ताप, सर्दी, खोकला आहे का? तसेच परदेशातून तुमच्या घरी कुणी आले आहे ? या संदर्भात माहिती घेत आहेत. मुकुंदनगरमधील नागरिक मात्र आरोग्यसेविकांना माहिती देत नसून त्यानाच दमदाटी करीत आहेत. काही ठिकाणी माहिती विचारण्यास गेल्यानंतर या आरोग्यसेविकांना दमदाटी करत त्यांच्याकडील रजिस्टर फाडून टाकले. काहींनी दरवाजे लावून घेतले तर काही थेट अंगावर धावून आले. अशा तक्रारी आरोग्यसेविकांनी केल्या आहेत. या घटनांनंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले असून तिसरा गुन्हा दाखल होण्याची प्र्रकिया सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी दिली भेट मुकुंदनगर परिसरात आरोग्यसेविकांना दमदाटीचे प्रकार घडल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या परिसरात भेट देऊन माहिती घेतली. सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्यसेविकांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी