राहुरी तहसील कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, निवडणूक नायब तहसीलदार अण्णासाहेब डमाळे, मंडळ अधिकारी भीमराज मंडलिक, सतीश कानडे, अव्वल कारकून वनिता कल्हापुरे, अभया राजवळ, महसूल सहायक शीतल आढाव, तलाठी चितळकर आदींचा बदली झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी तहसीलदार शेख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील भवर, सुनील हुडे, मंडल अधिकारी शिंदे, दत्तात्रय गोसावी, भाऊसाहेब मेहेत्रे, योगेश कुलकर्णी, अश्विनी नन्नोरे, शैलजा देवकाते, महेश देशमुख, तुळशीराम आघाव, अशोक बर्डे, जावेद शेख, अनिल धुमाळ आदींनी परिश्रम घेतले. महसूल नायब तहसीलदार पूनम दंडिले यांनी प्रास्ताविक केले. निवडणूक नायब तहसीलदार कविराज दुशिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रामाणिक काम केल्यास नागरिक सहकार्य करतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:23 IST