शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडीने सुरू केला केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 10:17 IST

केडगाव हत्याकांडाचा तपास बुधवारी सीआयडी पथकाने विशेष पथकाकडून वर्ग करून घेतला आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी अरूणकुमार सपकाळे हे पथकासह नगर येथे दाखल झाले असून, गुन्ह्याची कागदपत्रे हातात येताच त्यांनी तपासाला सुरूवात केली.

ठळक मुद्देशिवसैनिकांची हत्या : गुन्ह्याची कागदपत्रे वर्ग करून घेतली

अहमदनगर : केडगाव हत्याकांडाचा तपास बुधवारी सीआयडी पथकाने विशेष पथकाकडून वर्ग करून घेतला आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी अरूणकुमार सपकाळे हे पथकासह नगर येथे दाखल झाले असून, गुन्ह्याची कागदपत्रे हातात येताच त्यांनी तपासाला सुरूवात केली.स्थानिक तपासी यंत्रणेवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने केडगाव हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्याची विनंती गृहविभागाकडे केली होती. गृह विभागाने मान्यता दिल्यानंतर सीआयडीचे पोलीस उपाधीक्षक अरूणकुमार सपकाळे यांची तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. बुधवारी सपकाळे यांनी हा तपास वर्ग करून घेतला आहे. या प्रकरणात आता सीआयडी नव्याने काय तपास करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली. याप्रकरणी मयत संजय यांचा मुलगा संग्राम यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ३० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी पोलिसांनी ८ तर इतर २ अशा १० जणांना आतापर्यंत अटक झालेली आहे.  उर्वरित २२ जण फरार आहेत.आतापर्यंत यांना अटकआमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास उर्फ बी़एम़ कोतकर, रखी खोल्लम, संदीप गि-हे, महावीर मोकळे, विशाल कोतकर, बाबासाहेब केदार व भानुदास एकनाथ कोतकरया २२ जणांचे काय होणार ?आमदार अरूण जगताप, आ. शिवाजी कर्डिले, संदीप कोतकर, औदुंबर कोतकर, अशोक कराळे, नवनाथ कराळे, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्निल पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गांगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे, ज्ञानेश्वर कोतकर असे २२ जण फरार आहेत. सीआयडी पथक यांच्याबाबत काय भूमिका घेणार हा उत्सुकतेचा विषय आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड