शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांचा शाळेतच २४ जून पासून प्रवेश सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:59 IST

अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा शाळास्तरावर राबवली जाणार असून कागदपत्रांची पडताळणी देखील शाळास्तरावरच केली जाणार आहे. २४ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक व दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा शाळास्तरावर राबवली जाणार असून कागदपत्रांची पडताळणी देखील शाळास्तरावरच केली जाणार आहे. २४ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत आॅनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली. त्यात राज्यात १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.

त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना संदेश पाठवण्यात आले आहेत. दरम्यान आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेस शासनाने परवानगी दिली आहे. दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करून होत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ही प्रक्रिया यंदापुरती शाळास्तरावर होणार आहे. म्हणजे कागदपत्रांची सर्व पडताळणी शाळास्तरावरच होईल व अंतिम मान्यता तालुका पडताळणी समिती देईल. 

शाळांनी प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर लावून निवड झालेल्या मुलांच्या पालकांना संदेश पाठवून प्रवेशासाठी बोलवायचे आहे. गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. शाळेत आल्यानंतर पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत घ्यावी. कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे आॅनलाईन नोंद करावी, तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला, अशी नोंद करून पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, असे शिक्षण विभागाच्या सूचनांत म्हटले आहे. ---जिल्ह्यात ७९६५ अर्जआरटीईनुसार जिल्ह्यातील ३९६ शाळांत ३५४१ जागा भरायच्या आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातून ७ हजार ६५ अर्ज दाखल झाले होते.पैकी ३३८२ विद्यार्थ्यांची निवड लॉटरीतून झालेली आहे. इतर जण प्रतीक्षा यादीत आहेत.