राहुरी : तांभेरे (ता.राहुरी) येथील राजेंद्र गोविंद लांडे (वय-४५) या व्यसनी मुलाने आईचा खून केल्याची घटना रात्री घडली. आईचे निधन झाल्याचे पाहुण्यांना सांगत अंत्यविधीची तयारी सुरु असतानाच राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख पोलिस पथकासह घटनास्थली दाखल झाले. आरोपी राजेंद्र लांडे यास अटक करण्यात आली आहे.आरोपी लांडे हा आई इंदुबाई लांडे ( वय-७०) यांच्याबरोबर राहत होता. राजेंद्र हा व्यसनाधीन होता. या व्यसनामुळे आरोपीस बायकोही सोडून गेली होती. मध्यरात्री राजेंद्रने आईच्या डोक्यात, पोटावर फुकणीच्या साहाय्याने मारहाण केली. त्यामध्ये इंदुबाई लांडे यांचे जागीच निधन झाले. राजेंद्र लांडे याने आजारपणामुळे आईचे निधन झाले असून सकाळी अंत्यविधीला यावे, असा निरोप पाहुण्यांना कळविला. इंदुबाईचा खून झाल्याचे पाहुण्यांच्या लक्षात आले. पाहुण्यांनी राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांना याबाबत माहिती दिली. देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन अंत्यविधीस मज्जाव आरोपीस अटक केली आहे.
व्यसनाधीन मुलाने आईचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 12:04 IST
मध्यरात्री आरोपीने आईला मारहाण केली. त्यामध्ये आईचे जागीच निधन झाले. आजारपणामुळे आईचे निधन झाले असून सकाळी अंत्यविधीला यावे, असा निरोप आरोपीने पाहुण्यांना कळविला
व्यसनाधीन मुलाने आईचा केला खून
ठळक मुद्देव्यसनी मुलाने आईचा खून बायकोही सोडून गेली होतीआईच्या डोक्यात, पोटावर फुकणीच्या साहाय्याने मारहाण आजारपणामुळे आईचे निधन झाले असल्याचे पाहुण्यांना कळविले