आॅनलाईन लोकमत
पाथर्डी (अहमदनगर), दि़ २ - पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे पाच वर्षीय बालिकेवर ६५ वर्षीच्या आरोपीने बलात्कार केल्याची घटना शनिवारी घडली़ रात्री उशीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित बालिकेचे आई-वडिल शेतात कामासाठी गेले होते़ घरी एकट्या असलेल्या बालिकेला पाहून भगवान विश्वनाथ वाघमारे (रा़ ढाकणवाडी) या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला़ रात्री कामावरुन आलेल्या आई-वडिलांना शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या एका मुलीकडून ही घटना समजली़ त्यानंतर रात्री उशीरा त्यांनी पाथर्डी पोलीस ठाणे गाठून वाघमारे यांच्याविरोधात फिर्याद दिली़ पोलिसांनी वाघमारे यास अटक केली आहे़ पीडित बालिकेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.