शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीसाहेब, ३०० कोटींचे काय झाले? : माजी सभापतींचे स्मरणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 11:25 IST

महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे ३०० कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही.

अहमदनगर : महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे ३०० कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही. या निधीची मागणी करत भाजपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सोनाबाई तायगा शिंदे यांनी पक्षाला निवडणुकीत केलेल्या घोषणेची आठवण करून दिली आहे.महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाने सत्ता स्थापन केली आहे़ महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचा महापौर झाल्यास शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपये देऊ, अशी घोषणा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली होती़ तसेच महापालिका निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांचीही सभा शहरातील गांधी मैदान येथे झाली होती. त्यांंनीही शहरासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली होती़ मात्र गेल्या आठ महिन्यांच्या काळात एक रुपयाचाही निधी पालिकेला मिळाला नाही़ महापालिका निवडणुकीनंतर प्रथमच रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गांधी मैदानात होत आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिकेतील भाजपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सोनाबाई तायगा शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने पत्र पाठविले आहे़यापूर्वी त्यांनी १५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र दिले होते़ मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही़ त्यामुळे शिंदे यांनी आता थेट पंतप्रधानानांच पत्र लिहिले आहे़ महापालिका निवडणुकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणा केली होती़ त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेतून निधीची घोषणा करावी, अन्यथा पक्षावर नगरकर विश्वास ठेवणार नाहीत, असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हमहापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिलेला शब्द पाळला नाही़ त्यामुळे शहरासह नगरसेवकांवर टीका होऊ लागली असून, पक्षाच्या विश्वासार्हतेवर भाजपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापतींनी शंका उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAhmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूक