शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

छिंदम म्हणतो, मी राजीनामा दिलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 11:22 IST

: उपमहापौर पदाचा मी राजीनामा दिलाच नाही़ महापालिकेत दिलेला राजीनामा खोटा असून त्यावरील स्वाक्षरीही माझी नाही़ या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी महापालिकेला पत्र देऊन या राजीनामा प्रकरणाची माहिती मागितली आहे.

ठळक मुद्देफसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी: शिवाजी महाराजांबद्दल काढले होते अपशब्द

अहमदनगर : उपमहापौर पदाचा मी राजीनामा दिलाच नाही़ महापालिकेत दिलेला राजीनामा खोटा असून त्यावरील स्वाक्षरीही माझी नाही़ या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी महापालिकेला पत्र देऊन या राजीनामा प्रकरणाची माहिती मागितली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी छिंदम याच्या विरोधात नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची तीव्रता वाढल्यानंतर खासदार तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी छिंदम याची पक्षातून हकालपट्टी करत त्याचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतला असल्याचे जाहीर केले होते. छिंदम याला जामीन मिळाल्यानंतर तो नगर शहरात आला.  कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणामुळे पोलिसांनी त्याला दोनवेळा शहरातून हद्दपार केले होते. आता राजीनाम्याविषयी छिंदमने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पुन्हा नवीन चर्चा सुरू झाली आहे. छिंदम याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी अटकेत असताना माझा राजीनामा पालिकेत गेला कसा? या प्रकरणाची सखोल चौकशी करून राजीनामापत्र लिहून त्याच्यावर खोटी स्वाक्षरी करणाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे त्याने म्हटले आहे. छिंदमने तक्रार अर्ज दिल्यानंतर महापालिकेला पत्र देऊन राजीनाम्यासंदर्भात माहिती मागितली असल्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले.छिंदमच्या निशाण्यावर नेमके कोण?श्रीपाद छिंदम याची पक्षातून हकालपट्टी करुन त्याचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.आता मात्र, छिंदमने पलटी मारत तो राजीनामाच खोटा असून, त्यावरील सहीही माझी नसल्याचे पोलिसांना लेखी दिले आहे.

एव्हढेच नव्हे तर या प्रकरणातील दोषींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी त्याने पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे छिंदमच्या निशाण्यावर भाजपमधील नेमका कोण नेता आहे,याबाबत शहरात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.छिंदमनेच दिला होता राजीनामा - गांधीश्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द काढल्यानंतर त्याची पक्षातून मी हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यानेच उपमहापौरपदाचा राजीनामा आणून दिला होता. त्यामुळे मी पत्रकार परिषदेत तसे पत्रकारांना सांगितले होते, असे खासदार दिलीप गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShripad Chindamश्रीपाद छिंदमDilip Gandhiखा. दिलीप गांधी