शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानदाराची रोहित पवार यांनाच उडवाउडवीची उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:25 IST

जामखेड (जि. अहमदनगर) : दुकान बंद का ठेवले असे विचारले असता एका स्वस्त धान्य दुकानदाराने चावी नसल्याची खोटी सबब सांगत आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाच उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रकार राजुरी (ता. जामखेड) येथे सोमवारी दुपारी घडला. दुकानाचे कुलूप तोडून पंचनामा केल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याने तहसीलदारांनी त्या दुकानदारास ४८ तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड (जि. अहमदनगर) : दुकान बंद का ठेवले असे विचारले असता एका स्वस्त धान्य दुकानदाराने चावी नसल्याची खोटी सबब सांगत आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाच उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रकार राजुरी (ता. जामखेड) येथे सोमवारी दुपारी घडला. दुकानाचे कुलूप तोडून पंचनामा केल्यानंतर त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याने तहसीलदारांनी त्या दुकानदारास ४८ तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.आमदार रोहित पवार यांच्याकडे राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत अनेक तक्रारी गेल्या होत्या. सोमवारी खर्डा येथील टंचाईसंदर्भातील बैठक संपल्यानंतर पवार यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पुरवठा अधिकारी नितीन बोरकर यांसह राजुरी येथील प्रगती प्रतिष्ठान संचलीत स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट दिली. त्यावेळी दुकान बंद होते. त्यांनी स्वस्त धान्य दुकानाचे चालक शहाजी रामभाऊ राळेभात यांना बोलावून घेतले. त्यांना दुकान उघडण्यास सांगितले. त्यांनी चावी नसल्याची खोटी सबब सांगितली. तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली. ते चावी आणत नसल्याने पवार यांनी कुलूप तोडण्याच्या सूचना केल्या. दुकानाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा आढळून आला. मात्र धान्य नोंदीचे रजिस्टर दुकानात उपलब्ध नव्हते. त्यावेळी पवार व अधिकाऱ्यांनी त्या दुकानदाराची चांगलीच खरडपट्टी काढली.तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी धान्य दुकानदार शहाजी राळेभात यास तपासणी अहवालात नमूद केलेल्या त्रुटींचा खुलासा ४८ तासात न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे पत्र दिले आहे.--------तपासणीत आढळल्या अनेक त्रुटीमहसूलच्या पथकाने तेथील धान्याची तपासणी केली. यात एप्रिल व मे महिन्याचा धान्य दुकानदारास शासनाकडून गहू १०६.५० क्विंटल, तांदूळ १५१.५० क्विंटल, साखर १.९० क्विंटल अंत्योदय लाभार्थ्यांसाठी देण्यात आली होती. त्यापैकी धान्य वाटप केल्यानंतर दुकानात सहा क्विंटल गहू, तांदूळ १५.७९ क्विंटल व अंत्योदयची साखर ७५ किलो साठा जास्त आढळून आला. त्यानुसार धान्य दुकानदाराने पॉस मशीनवर लाभार्थ्याच्या स्वत:च्या अंगठ्याने पावत्या काढून धान्य वाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुकानदाराने लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले, असे अहवालात नमूद केले आहे. याशिवाय दुकानाचा वजनकाटाही प्रमाणित केलेला नाही. दुकानात कोणतेही दरपत्रक, माहिती फलकही दिसून आला नाही.---शेवगाव-पाथर्डीत रेशन दुकाने सील, कोरोनाचा ग्राऊंड रिर्पोट (हॅलो एकवर)-----------------फोटो--०४रोहित पवारआमदार रोहित पवार यांनी सोमवारी जामखेड तालुक्यातील राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाची झाडाझडती घेतली.