अहमदनगर : मुंबईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक सतीश रामाने यांना स्वस्तातील सोने खरेदी करणे चांगलेच महागात पडले़ सोने तर मिळालेच नाही उलट १५ लाखांचा फटका बसला. गुरुवारी रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी उरूस ज्ञानदेव चव्हाण (३४) व ज्ञानदेव चव्हाण (रा़ दोघे वाळकी ता़ नगर) या पिता-पुत्रांना अटक केली. रामाने यांना चव्हाण व त्याच्या साथीदारांनी फोन करून १५ लाख रूपयांत एक किलो सोने देतो, असे आमिष दाखविले़ रामाने यांना नगर येथे बोलावून घेतले़ रामाने यांच्याकडे १५ लाख रूपये आहेत, याची खात्री पटल्यानंतर शेतात दबा धरून बसलेल्या सहा ते सात जणांनी रामाने यांच्यासह त्यांच्यासमवेत आलेल्या मित्रांवर हल्ला केला व त्यांच्याकडील पैसे लुटले़ कुठे सांगितल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयांना जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी आरोपींनी दिली होती.
स्वस्तात सोने खरेदी पडली महागात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:37 IST