शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नेवाशात सोन्याचे दुकान फोडले : चार लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:40 IST

शहरातील बाजारपेठेतील औदुंबर चौकातील अथर्व ज्वेलर्स हे सराफ दुकान फोडून ३ लाख ९३ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी गुरूवारी पहाटे लंपास केले.

नेवासा : शहरातील बाजारपेठेतील औदुंबर चौकातील अथर्व ज्वेलर्स हे सराफ दुकान फोडून ३ लाख ९३ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी गुरूवारी पहाटे लंपास केले.याबाबत बालेंद्र मारूतीराव पोतदार यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्ही, डिव्हीआर उपकरण काढून चोरून नेले. दुकानातील काचेच्या ड्रॉवरखाली असलेल्या एक लाख त्रेचाळीस हजार रूपये किंमतीचे साडेतीन किलो चांदीचे दागिने व दोन लाख अडोतीस हजार रूपये किंमतीचे ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे.सीसीटीव्ही फुटेजनुसार गुरूवारी पहाटे ३ वाजून २२ मिनिटांच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. यावेळी चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे. गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या समुारास दुकान फुटल्याचे मालक बालेंद्र पोतदार यांच्या निदर्शनास आले.ठसे तज्ज्ञांची घटनास्थळी भेटपोलिसांनी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाने गुरूवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. दुकानातील ठसे घेण्यात आले. परिसरातील दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस हेडकाँस्टेबल तुळशीराम गिते अधिक तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा