शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

कर्डिले समर्थक आणि महाआघाडीत खडाजंगी ! : नगर तालुका खरेदी विक्री संघाची सभा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:48 IST

नगर तालूका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या मुद्द्यावरून महाआघाडीचे नेते आणि आमदार शिवाजी कर्डीलेंसह सत्ताधारी गटाचे नेते यांच्यात चांगली खडाजंगी झाली.

केडगाव : नगर तालूका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या मुद्द्यावरून महाआघाडीचे नेते आणि आमदार शिवाजी कर्डीलेंसह सत्ताधारी गटाचे नेते यांच्यात चांगली खडाजंगी झाली. पण सभा अर्धवट सोडून गेलेल्या महाआघाडीच्या नेत्यांचा आमदार कर्डीले यांनी समारोपाच्या भाषणात चांगलाच समाचार घेतला .नगर तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खरेदी विक्री संघाच्या इमारतीमध्ये आज पार पडली. या सभेसाठी सत्ताधारी गटाकडून आमदार शिवाजीराव कर्डीले तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रोहीदास मगर, संभाजी पवार , श्रीकांत जगदाळे, ज्ञानदेव शेळके, सुरेश सुंबे, तुकाराम वाघुले, अंबादास बेरड, यांसह बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक संदीप कडीर्ले, तर महाआघाडीचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे,प्रताप शेळके, गोविंद मोकाटे, पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर, व्ही.डी. काळे, डॉ. दिलीप पवार, गुलाब शिंदे, प्रविण कोकाटे , कैलास लांडे आदी उपस्थित होते. या सभेत तालुका खरेदी विक्री संघाची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधावी. त्यामुळे तालुका संघाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विषय चर्चेत आला. यामुळे महाआघाडीच्या नेत्यांनी सत्ताधा-यांना धारेवर धरले. जुनी इमारत का पाडायची, त्या ठिकाणी असणा-या गाळे धारकांचे करार अजून संपेलले नाही त्यांचे काय, त्यांच्या अनामत रकमेचे काय, तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याचे काय यांसह अनेक प्रश्नांवरून महाआघाडी आणि आमदार कर्डीले यांसह सत्ताधारी भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. महाआघाडीच्या नेत्यांचे वाढलेले आवाज पाहून म्हणणे थोडक्यात व शांत मांडा पण जोरात बोलू नका असा इशाराही आमदार कर्डीले यांनी दिला. आम्ही शेतकरी असून या संघाचे सभासद आहोत तरी आमचे म्हणणे ऐकले जात नाही. नवीन इमारत बांधून त्यामधील गाळ््यांमध्ये यांना पैसे कमवायचे आहेत. असा आरोप करत महाआघाडीचे नेते सभा अर्धवट सोडून निघून गेले. समारोपाच्या सभेत मात्र आ.कडीर्ले यांनी महाआघाडीच्या नेत्यांचे वाभाडे काढले. विकास घाणून पाडायचा, या ठिकाणी गोंधळ घालून स्वत:चे कपडे फाडून घेत माझ्यावर दहशतीचा आरोप करण्याचा महाआघाडीचा डाव होता, असे कर्डिले यांनी स्पष्ट केले .‘‘नेप्ती उपबाजार समिती बांधली, कांदा मार्केट तिकडे नेले. त्यावेळीही महाआघाडीने असाच विरोध केला होता. पण तो निर्णय योग्यच होता हे आज दिसून आले आहे. तिकडे जावून आता हे कांद्याचे आंदोलन करत प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आम्ही बाजार समितीमध्ये बसवला. पण तो आम्ही काढून टाकणार असा प्रचार करत लोकांच्या मनात विष कालवण्याचा यांनी प्रयत्न केला. तालुका संघाच्या नवीन इमारतीमुळे संघाचे उत्पादन वाढणार आहे. यातील काहींनी संघाच्या मालकीचे पत्रे, सिमेंट आणि पाईप नेलेले आहेत. तालूका संघाचे वाटोळे झाले पाहीजे आणि पुन्हा आमच्यावर आरोप करता आले पाहीजेत यासाठी यांचा खटाटोप सुरू असून प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे सगळे चालले आहे. ’’- आमदार शिवाजी कर्डीले‘‘तालुका संघाची इमारत ही शासकीय निधीतून बांधलेली आहे ती पाडता येते का. त्या गाळे धारकांचे पूवीर्चे करार आहेत ते अजून संपलेले नाहीत. त्याचे ३२ ते ३३ लाख डिपॉझीट संघाकडे जमा आहेत, त्याचे काय? इमारत पाडताना बांधकाम विभागाच्या स्ट्रक्चरल आॅडीटरकडून पाहणी अहवाल घ्यावा लागतो. तो घेतलेला नाही. महानगर पालिकेचे अधिकारी बल्लाळ यांना दडपशाही करून अहवाल घेतला आहे. बाजार समितीमध्ये जे घोटाळे यांनी केलेत तेच आता संघात करणार आहेत.-संदेश कार्ले,सदस्य, जिल्हा परिषद

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिले