शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

३०  अधिका-यांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:06 IST

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे ३० महसूल व पोलीस अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात ११ उपजिल्हाधिकारी, ...

अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे ३० महसूल व पोलीस अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत. त्यात ११ उपजिल्हाधिकारी, तसेच १६ तहसीलदारांचा समावेश आहे. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले, तसेच जिल्ह्याचे रहिवासी असलेले हे अधिकारी आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महसूल अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश शासन काढणार आहे. महसूल खात्यासाठी एका पदावर तीन वर्षे व एका जिल्ह्यात चार पेक्षा अधिक वर्ष सेवा हा बदल्यांचा प्रमुख निकष आहेत. याशिवाय जिल्ह्यात मूळचे रहिवासी असणारे अधिकारी बदलीस पात्र ठरणार आहेत. महसूल, पोलीस व ग्रामविकास विभागाचे अधिकारी थेट निवडणूक कामाशी संबंधित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने बदलीपात्र अधिकाºयांची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे निकषात बसणाºया अधिकाºयांची यादी पाठवली होती. या यादीप्रमाणे बदल्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. फेब्रुवारीपासून दुष्काळाची दाहकता अधिकच वाढणार आहे. अनुभवी अधिकाºयांची बदली होणार असल्याने नव्याने बदलून येणाºया अधिकाºयांना या दुष्काळाला समोरे जावे लागणार आहे. याशिवाय ऐनवेळी येऊन लोकसभा निवडणुकीची व्यापक तयारी करणे हेही मोठे आव्हान या अधिकाºयांसमोर असणार आहे.अशा वेळी जवळपास संपूर्ण नवी टीम घेऊन निवडणूक प्रक्रिया व दुष्काळाशी सामना करताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे. अशातच त्यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार आहे.संभाव्य बदलीपात्र अधिकारीअतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, पुनर्वसनच्या उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, उपजिल्हाधिकारी संदीप आहेर (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ (भूसंपादन), उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे (शिर्डी), उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे (संगमनेर), उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज (श्रीगोंदे-पारनेर), उपजिल्हाधिकारी वामन कदम (रोजगार हमी योजना), उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव (भूसंपादन) याशिवाय तहसीलदार मुकेश कांबळे (अकोले), साहेबराव सोनवणे (संगमनेर), किशोर कदम (कोपरगाव), माणिक आहेर (शिर्डी), सुभाष दळवी (श्रीरामपूर), अनिल दौंडे (राहुरी), सुधीर पाटील (नेवासे), विनोद भामरे (शेवगाव), किरण सावंत (कर्जत), गणेश मरकड (पारनेर), आप्पासाहेब शिंदे (नगर), जितेंद्र इंगळे, मनीषा राशीनकर, राजेंद्र थोटे, सदाशिव शेलार व हेमलता बडे, राहुल कोताडे (जिल्हाधिकारी कार्यालय) यांच्या बदलीची शक्यता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर