शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

राज्यात सत्ता परिवर्तन करा

By admin | Updated: October 5, 2014 23:57 IST

नेवासा/मिरजगाव : महाराष्ट्राचा वनवास संपविण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपाची सत्ता हवी असून, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले.

नेवासा/मिरजगाव : महाराष्ट्राचा वनवास संपविण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यात भाजपाची सत्ता हवी असून, राज्यात परिवर्तन घडवा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केले. आघाडी सरकारने सिंचनामध्ये केलेल्या सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पैसे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले असते तर याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोनं पिकवलं असते, असेही त्या म्हणाल्या. नेवासा व मिरजगाव येथील भाजपाच्या प्रचार सभेत स्मृती इराणी या बोलत होत्या. यावेळी स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, मोठ्या संघर्षानंतर केंद्रात परिवर्तन झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही परिवर्तन होणार आहे. दोन्ही काँग्रेसच्या पापाचा घडा भरला आहे. शेतकऱ्यांच्या भूमीवरच काँग्रेस आघाडीच्या राजवटीत शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार जनता विसरली नाही. १५ वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता वनवास भोगत आहे. १५ आॅक्टोबरला मतदान करून हा वनवास संपवा. देशात गेली ६० वर्षे काँग्रेस सरकारने गरिबी हटाव म्हणून देशात गरिबी वाढवण्याचे पाप केले असून, यापुढे देशातील प्रत्येक व्यक्ती सधन होण्यासाठी ‘जन-धन’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक योजना सामान्यांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहनही इराणी यांनी केले. मिरजगाव येथील सभेत खा.दिलीप गांधी, जामखेड-कर्जत मतदारसंघाचे उमेदवार आ. राम शिंदे, आष्टी-पाटोद्याचे उमेदवार माजी आ.भीमराव धोंडे, नामदेव राऊत, अशोक खेडकर, गुलाब तनपुरे, रमेश झरकर, सुवर्णा पाचपुते, शांतीलाल कोपनर, भगवान मुरूमकर, रवींद्र सुरवसे आदी उपस्थित होते.नेवासा येथील सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष दिनकरराव गर्जे होते. यावेळी नेवासा मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे अनिल ताके, सचिन देसर्डा, अंबादास कोरडे, नवनीतभाई सुरपुरिया, बाबासाहेब खराडे, रामभाऊ खंडाळे, संदीप आलवणे, बाबा कांगुणे, नामदेव खंडागळे, भाऊसाहेब वाघ, पोपटराव जीरे, रहेमानभाई पिंजारी, अ‍ॅड. विश्वास काळे, बाळासाहेब कुलकर्णी, महिला आघाडीच्या यमुनाताई रेळकर आदी उपस्थित होते. भास्कर कणगरे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)