शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 15:26 IST

नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

नेवासा : नेवासाफाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेनेते दशरथ सावंत यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.        नेवासाफाटा येथील राजमुद्रा चौकामध्ये दुपारी झालेल्या रास्तारोको प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ.अशोकराव ढगे यांनी आलेल्या शेतक-यांचे स्वागत केले. राज्याचे उपाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी प्रास्ताविक करतांना शेतक-यांच्या व्यथा मांडल्या. शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येऊन ७/१२ कोरा करण्यात यावा. कृषिपंपाचे वीज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावे. एफ.आर.पी.प्रमाणे एक रकमी व सरकारी अनुदान मिळावे. दुष्काळ निधी किमान पाच हजार एकराप्रमाणे शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. कांदा आणि दुधास शासकीय अनुदान मिळावे. शेतक-यांना पेन्शन अनुदान योजना लागू करावी. अशा मागण्या त्यांनी यावेळी बोलताना मांडल्या.    यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास कोरडे, संघटनाध्यक्ष प्रकाश पोकळे, गुलाबराव डेरे, प्रताप पटारे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांची यावेळी भाषणे झाली. सदरचा रास्तारोको अर्धा तास चालला. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर शेतकरी नेते पी.आर.जाधव यांनी आभार मानले. यावेळी निवासी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा