राहुरी : येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वांबोरीचे उपसरपंच उदयसिंह पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी शामराव निमसे यांची बिनविरोध निवड झाली़नुकतीच कारखान्याची निवडणूक होऊन कारखान्यावर राधाकृष्ण विखे यांनी एकहाती वर्चस्व मिळवले. शुक्रवारी पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात अध्यक्षपदी वांबोरीचे उपसरपंच उदयसिंह पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी शामराव निमसे यांची बिनविरोध निवड झाली़ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व डॉ़ सुजय विखे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सत्कार करण्यात आला़कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्यासंदर्भात पूर्तता सुरू आहे. पहिल्या करारात आॅडिट अहवाल, शासन देणी, बँक देणी, ऊस उत्पादक व कामगार देणी यासंदर्भात आढावा घेतला जाईल़ त्यानंतर दुसरा करार होईल, अशी माहिती डॉ़ सुजय विखे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
उदयसिंह पाटील तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष
By admin | Updated: June 25, 2016 00:39 IST