शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कापूरवाडीत खडीक्रशरच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ

By admin | Updated: April 7, 2017 17:55 IST

खडी क्रशरच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी गावकऱ्यांनी थेट खडी क्रशर बंद करुन तेथील साहित्याला आग लावल्याची घटना शुक्रवारी घडली़

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ७- नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे असणाऱ्या खडी क्रशरच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी गावकऱ्यांनी थेट खडी क्रशर बंद करुन तेथील साहित्याला आग लावल्याची घटना शुक्रवारी घडली़ त्यामुळे कापूरवाडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे जवळपास २० खडी क्रशर आहेत. यातील काही गावातील लोकांचे तर काही बाहेरच्या लोकांच्या मालकीची आहेत. खडी क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे गावकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. यातून होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने काही महिन्यांपूर्वीच गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना निवदेन देऊन खडी क्रशर बंद करण्याची मागणी केली होती. क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत असल्याची गंभीर बाब गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी गावातील काही महिला व गावकरी एकत्र जमले. त्यांनी थेट खडी क्रशर केंद्रावर जाऊन खडी क्रशर बंद केले. तसेच तेथील यंत्र सामुग्रीची जाळपोळ करत आपला संताप व्यक्त केला. खडी क्रशर चालकांनी धुळीचा बंदोबस्त करायला हवा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच गावातील काही शेतकऱ्यांची जमीन या क्रशरच्या धुळीमुळे नापीक होत आहे़ जिल्हाधिकारी करणार पाहणीकापूरवाडी येथील खडी क्रशरच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याची गावकऱ्यांची मागणी प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिल्याने शुक्रवारी जाळपोळ व तोडफोडीचा प्रकार घडला. त्यामुळे जिल्हाधिकारी अनिल कवडे हे शनिवारी कापूरवाडीत भेट देऊन क्रशरची पाहणी करून गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.खडी क्रशर जवळच शाळाकापूरवाडी येथील खडी क्रशच्या जवळच जिल्हा परिषदेची शाळा आहे. या क्रशरमधून बाहेर पडणारी धूळ व त्यातील आवाज यांचा त्रास या शाळकरी मुलांना होत आहे. यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुलांना येथे शिक्षणही घेता येत नाही़ त्यामुळे पालकांमध्ये संताप होता़