शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीमध्ये दोन गटांत धुमश्चक्री, २५ जण जखमी, आठ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 23:06 IST

श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील जोशी वस्तीवर तिरुमली नंदी समाजातील जात पंचायत सदस्यांच्या बैठकीत जातीतून बहिष्कृत केलेल्या लोकांनी मोबाइलद्वारे शूटिंग करण्याचा प्रयत्न केल्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील जोशी वस्तीवर तिरुमली नंदी समाजातील जात पंचायत सदस्यांच्या बैठकीत जातीतून बहिष्कृत केलेल्या लोकांनी मोबाइलद्वारे शूटिंग करण्याचा प्रयत्न केल्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये तलवार, गज, कु-हाडीचा सर्रास वापर झाला. या घटनेत सुमारे २५ जण जखमी झाले. यामध्ये आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी दोन तरुणींना विवस्त्र करून मारहाण करण्याचा प्रकार घडला. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.या मारामारीत व्यंकट बाबू काकडे, उत्तम बाबूराव काकडे, रामदास गंगाराम मले, गंगाराम हनुमंत पालवे, भाऊसाहेब गंगाराम पालवे, कान्हू बाबू गायकवाड, बाबाजी कान्हू गायकवाड, रमा गायकवाड, सोनाली रमा गायकवाड,  शालन गोविंद पालवे, रावसाहेब पालवे, सुरेश भीमा पालवे, सुभाष काकडे, बायडाबाई फूलमाळी, साहेबराव काकडे, अशोक पालवे, अलका मले हे जखमी झाले आहेत. तीन पिढ्यांपासून नंदीवाले समाजात जातीतून बहिष्कृत केलेले लोक व जात पंचायत सदस्यांमधील वाद धुमसत आहे.या गटात गेल्या वर्षी मारामारी झाली होती. त्यावेळी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी जात पंचायत सदस्यांनी बैठक बोलावली होती. ज्या कुटुंबांना जातीमधून बाहेर काढले त्यातील काही महिला त्यांच्या घरांमधून ही जात पंचायत पाहात होत्या. तर एक जण जातपंचायत सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन या जातपंचायतीची शूटिंग करत होता. याचा राग आल्यामुळे ‘तू शूटिंग का करतोस’ या कारणावरून जातपंचायतीमधील लोकांनी या मुलाला मारहाण केली. मारहाण करणारे  बीड, पुणे जिल्ह्यातील ओझर, धामणगाव तसेच काही स्थानिक होते. या दोनशे ते अडीचशे लोकांनी कारखान्यावरील तिरुमली नंदी समाजातील वस्तीवर हल्लाबोल करत तलवार, लोखंडी गज, दगडाने मारहाण केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर