शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

संगणक अभ्यासक्रमात करिअरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:51 IST

संंगणक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या दोन-तीन दशकांमध्ये लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, आगामी काळातसुद्धा विविध क्षेत्रांत असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत.

डॉ.भास्कर झावरेसंंगणक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या दोन-तीन दशकांमध्ये लाखो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, आगामी काळातसुद्धा विविध क्षेत्रांत असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. सार्वजनिक, शासकीय व खासगी आस्थापनामध्ये वेगाने होणारे संगणकीकरण, भ्रमणध्वनी यामुळे झालेली क्रांती, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा, ई-कॉमर्स, आॅनलाईन मार्केटिंग, डिजिटल इंडिया, नेट-बँकिंग, मोबाईल अ‍ॅपद्वारे एका क्लीकवर उपलब्ध सुविधा, सायबर सिक्युरिटी, नेटवर्किंग, नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट व वाढते सेवाक्षेत्र यांच्या गरजेनुसार संगणक प्रणाली विकसित करणे व त्यांचे व्यवस्थापन करणे अशा विविध संधी उपलब्ध आहेत. परंतु या उपलब्ध संधीचा फायदा घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी योग्य अभ्यासक्रमाची निवड करणे अपेक्षित आहे.संगणक अभ्यासक्रमाच्या निवडीला सध्या मोठा वाव आहे. राष्टÑीय पातळीवर पदवीस्तरावर ५३ पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध असून, पदव्युत्तर स्तरावर संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित २७ च्या वर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊन संगणक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी विचारपूर्वक अभ्यासक्रमाची निवड करणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन तसेच अभियांत्रिकी विद्याशाखांमध्ये विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विहीत प्रवेश पद्धती निश्चित केलेली आहे.बारावी (विज्ञान) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. पदवीस्तरावर श्रेयांक पद्धती (क्रेडिट बेस्ड सिस्टिम) द्वारे अभ्यासक्रम रचना व मूल्यांकन उपलब्ध असणारा बी.सी.ए. हा अभ्यासक्रम विज्ञान शाखेमध्ये उपलब्ध आहे. पदवी स्तरावर श्रेयांक पद्धती म्हणजे औद्योगिक क्षेत्रांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे तांत्रिक शिक्षण देण्यावर भर दिला गेला आहे. थेअरी आणि प्रॅक्टीकल्सद्वारे अभ्यासक्रमातील टक्केवारी बरोबरीची आहे.विज्ञान शाखेमधून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी.सी.ए., बी.एस्सी. (संगणक) व बी.एस्सी. (अ‍ॅनिमेशन) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने बी.बी.ए. (कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन) हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.बºयाचशा महाविद्यालयांचे प्रवेश आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. प्रवेशासंबंधित सविस्तर माहिती स्थानिक वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात येते.विद्यार्थी व पालकांनी अभ्यासक्रमाची निवड करताना सजगता दाखविली पाहिजे. आपल्या पाल्याची शैक्षणिक गुणवत्ता, आवड आणि अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेल्या विषयांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. विशेषत: पालकांनी लक्षात घेतले पाहिजे की आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उच्च शिक्षणावरील आर्थिक भार खर्च म्हणून न पाहता त्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे. यासाठी महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडीसाठी पालक व विद्यार्थी यांनी समक्ष भेट देऊन उपलब्ध शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, प्रशिक्षित मार्गदर्शक याबद्दलची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. पदवी स्तरावरील प्रथम वर्ष हे आपल्या पाल्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा कालखंड आहे असे समजून पालकांनी आपल्या पाल्याची आवड, बौद्धिक कुवत या बाबींवर विचारपूर्वक चर्चा करून निर्णय घेणे संयुक्तिक आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मार्गदर्शन घेण्यास हरकत नाही.शेवटी प्रवेशित विद्यार्थ्याने स्वत:चे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी कठोर परिश्रम, निरंतर अभ्यास व कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollegeमहाविद्यालय