बेलापूर येथे गुरुवारी सकाळी ग्रामस्थांची बैठक पार पडली. शनिवारच्या बंदबरोबरच हिरण यांच्याबाबत ठोस माहिती देणा-यास १ लाख रुपयांचे बक्षीस यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, जि.प. सदस्य शरद नवले, पं.स. सदस्य अरुण नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भरत साळुंके, सुनील मुथ्था, रवींद्र खटोड, अशोक गवते, अजय डाकले, अशोक पवार, प्रफुल्ल डावरे, प्रशांत लढ्ढा, शांतीलाल हिरण, रमेश अमोलिक, रत्नेश गुलदगड, गणेश फुलभाटी, भास्करराव खंडागळे, देवीदास देसाई, रणजित श्रीगोड आदी उपस्थित होते.
या अपहरणाबाबत पोलिसांना चुकीची माहिती देऊ नये. त्यामुळे तपास भरकटतो तसेच वेळ खर्ची होतो. तपासाची दिशा त्यामुळे भरकटण्याची भीती असते. अचूक व ठोस माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. रविवारनंतर आंदोलनाचे वेगळी रूपरेषा ठरविली जाणार आहे. दरम्यान, श्रीरामपूर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष मारुती बिंगले यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना निवेदन देण्यात आले. हिरण यांच्या अपहरण प्रकरणी व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. असा अनुचित प्रकार यापुढे होऊ नये यासाठी पोलिसांनी कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. पोलिसांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात. अन्यथा भाजपच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, जिल्हा कार्यकारिणी सदस्या अनिता शर्मा, मिलिंदकुमार साळवे, अरुण धर्माधिकारी, अजित बाबेल, बंडूकुमार शिंदे, आनंद बुधेकर, रूपेश हरकल, अमित मुथ्था, श्रेयस झिरंगे, डॉ. ललित सावज, रवी पंडित, उज्ज्वल कुमार डाकले, इंजि. चंद्रकांत परदेशी आदींच्या सह्या आहेत.
------