शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

संवर्ग १ कर्मचाऱ्यांची नोंद सेवापुस्तकात होणार; जि.प.च्या बदल्यांतील बोगसगिरीला बसेल चाप

By चंद्रकांत शेळके | Updated: July 5, 2023 20:00 IST

या पडताळणीची प्रक्रिया खातेप्रमुखांकडून व्यवस्थित होताना दिसत नसल्याचे समोर येत आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील बदल्यांमध्ये बोगस प्रमाणपत्र सादर करून बदल्यांमध्ये सूट घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आळा बसावा, यासाठी आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांच्या या प्रमाणपत्राबाबत सेवापुस्तकात नोंद केली जाणार आहे. तशा हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ च्या बदल्यांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी दिव्यांग, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच मुले मतिमंद अथवा गंभीर आजाराने आजारी असल्याची प्रमाणपत्रे सादर करत बदलीत सवलत मिळवली आहे. मात्र, ही सर्व प्रमाणपत्रे वैध आहेत का? याबाबत साशंकता आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेत प्रमाणपत्रांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. जे कर्मचारी प्रमाणपत्र पडताळणीत दोषी असतील त्यांच्यावर निलंबनासह बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. परंतु या पडताळणीची प्रक्रिया खातेप्रमुखांकडून व्यवस्थित होताना दिसत नसल्याचे समोर येत आहे.

जलसंधारण विभागाच्या बदली प्रक्रियेत एका महिलेने परित्यक्ता असल्याचे श्रीगोंदा नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. श्रीगोंदा येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र कशाच्या आधारे दिले याबाबत ‘लोकमत’ने शहानिशा केली असता त्या महिलेने दिलेले स्वयंघोषणापत्र व नगरपरिषद अध्यक्षांची शिफारस, आधारकार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र एवढ्याच कागदपत्रांच्या आधारे हे प्रमाणपत्र वितरित केल्याचे दिसत आहे. या महिलेवर काय अन्याय झाला? त्याबाबतची कायदेशीर लढाई काय झाली? याची काहीही कागदपत्रे नगरपरिषदेने पाहिलेली दिसत नाहीत.

अशाच प्रकारे अनेक महिला बनावट परितक्त्या किंवा घटस्फोटिता असल्याचे प्रमाणपत्र देतात. त्या आधारे पूर्ण सेवेत बदलीत लाभ घेतात. परंतु दुसरीकडे आपल्या पतीसोबत राहत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. परितक्त्या किंवा घटस्फोटिता असल्याचे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे नसल्याने त्यांचा पतीच कायदेशीर वारस ठरतो. त्यालाच तिचे सर्व लाभ मिळतात. नेमक्या याच बाबीला अटकाव घालण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन संवर्ग १मध्ये बदली घेतली असल्यास तसा उल्लेख संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तकात करणार आहे. म्हणजे एखादी कर्मचारी खोटी परितक्ता असेल तर तिचा वारसदार पती ठरणार नाही. या भीतीने ते पुढील वेळी बदलीसाठी अशी खोटी कागदपत्रे सादर करणार नाहीत. नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये ज्यांनी संवर्ग १मध्ये बदलीचा लाभ घेतला अशा कर्मचाऱ्यांना त्यांची प्रमाणपत्रे पडताळणी करून आणण्यास सांगितले आहे. दोन दिवसांत सर्व अहवाल येतील. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. आतापर्यंत अपंग कर्मचाऱ्यांची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात होत होती. आता संवर्ग १ मध्ये लाभ घेणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचीही नोंद त्यांच्या सेवापुस्तकात केली जाणार आहे. - राहुल शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जि.प

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर