शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

नगर तालुक्यातील १० गावांचा कोरोनाला बाय-बाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST

केडगाव : कोरोनाच्या दहशतीतून बाहेर पडत नगर तालुक्यातील १० गावांनी कोरोनाला बाय-बाय केले आहे. या गावात सध्या सक्रिय रुग्णांची ...

केडगाव : कोरोनाच्या दहशतीतून बाहेर पडत नगर तालुक्यातील १० गावांनी कोरोनाला बाय-बाय केले आहे. या गावात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. आणखी १५ गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. यात २६० जणांचा यात बळी गेला. तालुक्यात १२ हजार ८५६ इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. ११ हजार ३४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एकट्या एप्रिल महिन्यात ९ हजार ८२४ जणांना कोरोनाची बाधा झाली.

आदर्श गाव हिवरेबाजारने कोरोनामुक्तीचा संकल्प केला आहे. सोनेवाडी, जांब, भोयरे खुर्द, देऊळगाव सिद्धी, गुणवडी, पिंप्रीघुमट, नांदगाव, कोळपे आखाडा, निमगाव घाणा, हमिदपूर या गावांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या या गावात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. पिंपळगाव लांडगा, आव्हाडवाडी, निबोंडी, मदडगाव, गुंडेगाव, आंबिलवाडी, पारगाव मौला, जखणगाव या गावात सक्रिय रुग्णांची संख्या प्रत्येकी एकवर आली असून बारदरी, शहापूर, साकत, दहिगाव, वडगाव तांदळी, वाटेफळ ही गावे ही कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.

---

नांदगावने वापरली मतदानासारखी यंत्रणा

मतदानाच्या वेळी मतदारांना मतदान करण्यासाठी जशी यंत्रणा वापरतो तशीच यंत्रणा कोरोना रुग्णाला कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यासाठी वापरली. कोरोना समितीमधील सरपंच, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका आम्ही सर्वांनी गाव पिंजून काढले. रुग्ण आढळून आल्यानंतर त्याला लगेच वाहनाची व्यवस्था करून कोविड सेंटरला उपचारासाठी दाखल करत होतो. काही रुग्णाला तर घरी जाऊन उचलून कोविड सेंटरला पोहोच केले. प्रचारात ज्या पद्धतीने वाहन यंत्रणा वापरतो तशीच यंत्रणा दवाखान्यात पोहच करण्यासाठी वापरली. सात दिवस कडक जनता कर्फ्यू केला होता. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती सरपंच सखाराम सरक यांनी दिली.

---

नागरिकांचा रोष ओढावला मात्र हमिदपूर कोरोनामुक्त केले

हमीदपूर ग्रामपंचायतीने कडक लॉकडाऊन केल्यामुळे आज गावात एकही कोरोना रुग्ण नाही. गावात १० ते १२ कोरोना रुग्ण होते. ती संख्या वाढू नये यासाठी कोरोना समिती कडक कार्यवाही सुरू केली. यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळही आली. गावात वाड्यावस्त्यावर प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी केली. दोन वेळेस तपासणी केली. गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली. चौकाचौकात बसणारे तरुण वर्गांनी समजून सांगितल्यामुळे चौकात होणारी गर्दी एकदम कमी झाली. दहा दिवस नागरिकांचा संपर्क होऊन नाही दिला. घरोघरी जाऊन जनजागृती केली, अशी माहिती छबुराव कांडेकर यांनी दिली. सरपंच नीलेश वैराळ, उपसरपंच प्रमिला कांडेकर, ग्रामसेवक देवीदास जाधव यांचेही सहकार्य लाभले.

---

गावकऱ्यांच्या एकीने गुणवडीला फायदा...

गुणवडी गावाला ग्रामस्थांच्या एकीने फायदा झाला. गाव कोरोनामुक्त झाले. गावात सध्या एकही करोना रुग्ण नाही. हे सर्व सरपंच रंजना श्याम साळवे, उपसरपंच रावसाहेब शेळके व कोरोना ग्रामस्तरीय समिती यांच्या नियोजनासह माजी सरपंच वाल्मीक नागवडे, माजी सरपंच महेंद्र शेळके, सामाजिक कार्यकर्ते योगेश शेळके, दत्तात्रय कुटे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश शेळके, राजेंद्र कोकाटे, अमोल नागवडे, सुनील शेळके, ग्रामसेविका के. बी. शिंदे, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे सर्व शक्य झाले. डॉ. नितीन शेळके, डॉ. संजय शेळके, डॉ. भागवत बिभिशन यांनी गावातील रुग्णांची काळजी घेऊन इतर आजार व कोरोनावर नियंत्रण ठेवले.

---

ग्रामपंचायत मार्फत गावातील सर्व व्यावसायिकांना व ग्रामस्थांना लाऊडस्पीकरवरून वेळोवेळी सूचना दिल्या जात होत्या. तसेच गावातील रुग्णांना सेवा देणारे डॉ. किरण गणबोटे यांनीही रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसली की लगेच तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

- प्रा. घनश्याम गिरवले,

सरपंच, देऊळगाव सिद्धी