शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नियंत्रणाखाली दूध खरेदी : दूध संघांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 11:00 IST

सरकारने खासगी दूध संघांना दणका दिला असून, जिल्ह्यातील सहा खासगी , तर सहकारी सात दूध संघावर शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संघांचे धाबे दणाणले आहेत.

अण्णा नवथरअहमदनगर : सरकारने खासगी दूध संघांना दणका दिला असून, जिल्ह्यातील सहा खासगी , तर सहकारी सात दूध संघावर शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संघांचे धाबे दणाणले आहेत.गेल्या १ आॅगस्टपासून दूधाला प्रति लिटर ५ रुपये आनुदान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा दुग्ध विकास अधिकारी कार्यालयामार्फत शासकीय आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. २० हजार लिटरहून अधिक दूध संकलन करणा-या दूध संघांवर शासकीय अधिका-यांची नियुक्त करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात २० हजारांहून अधिक दूधाचे संकलन करणारे अंदाजे ७० दूध संकलन केंद्र आहेत. त्यापैकी मोठ्या १३ प्रकल्पांवर शासकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दूध संघांकडून शासन नियमाप्रमाणे भाव दिला जातो किंवा नाही, यावर शासकीय अधिका-यांची लक्ष ठेवून आहेत. तसेच दररोज संकलित होणारे दूध किती आहे, त्याचा हिशोब कसा ठेवला जातो, याची तपासणीही केली जात आहे. उर्वरित दूध सघांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फिरती पथके नियुक्ती करण्यात आले आहेत़ दूधाला प्रति लिटर २५ रुपये, याप्रमाणे भाव देणे बंधनकारक आहे. त्यापैकी शासकीय आनुदानापोटी दूध संघांना ५ रुपये मिळतील. त्यासाठी त्यांना सरकारी पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक आहे.प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला दुधाचे पेमेंट उत्पादकांना केले जाणार असून,त्यानंतर दूध संघांना आनुदानाची रक्कम शासानकडून अदा केली जाईल. दूध उत्पादकांच्या खात्यावर २५ रुपये जमा होतात किंवा नाही, याची खात्री केली जाणार आहे. त्यासाठी दूध उत्पादकांच्या बँक उतारेही प्रशासनाकडून मागविण्यात आले आहेत. शासकीय दरानुसार दूध संघाने दूधा भाव न दिल्याचे आढळून आल्यास दूध संघांवर थेट शासनाकडून कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात दररोज २४ लाख ६० हजार लिटर दुधाचे संकलन होते. सर्वाधिक १७ लाख दूधाचे संकलन खासगी दूध संघामध्ये होते. शासनाच्या नव्या नियमानुसार त्यावर नियंत्रण आले आहे.कमीत कमी दुधाला २५ रुपये दर निश्चित झाला असून, आनुदानाची रक्कम दूध संघाच्या बँक खात्यावर जमा होईल. आनुदान जमा करण्यासाठी खास सॉप्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे.या संघावर प्रशासकांची नियुक्तीप्रभात, मळगंगा, व्हीआरीएस, पतंजली, फे्रश अ‍ॅण्ड नॅचरल, एसआर थोरात, संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, राहुरी तालुका सहकारी दुध संघ, गोदावरी खोरे सहकारी दुध संघ, या संघांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmilkदूध