शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दमबाजीला कंटाळून उद्योजकाची नगरमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:04 IST

शेड विकत घेण्यासाठी दोघांकडून होत असलेल्या धमकीला कंटाळून एमआयडीसीतील उद्योजकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली़ रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास शहरातील पारिजात चौकात ही घटना घडली.

अहमदनगर : शेड विकत घेण्यासाठी दोघांकडून होत असलेल्या धमकीला कंटाळून एमआयडीसीतील उद्योजकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली़ रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास शहरातील पारिजात चौकात ही घटना घडली.बलराज आत्माराम बठेजा (वय ५८, रा. तारकपूर) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. बठेजा यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्यानंतर त्यांचे नातेवाईक अमित बठेजा यांनी तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला.यावेळी मयत बठेजा यांच्या खिशात त्यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या शीतल इंडस्ट्रिज कंपनीच्या लेटरहेडवर लिहिलेली चिठ्ठी मिळाली. ही चिठ्ठी हिंदी भाषेत असून, त्यावर मयत बठेजा यांची स्वाक्षरी आहे. ‘मी माझ्या शेडच्या डिपॉजिटसाठी एका व्यक्तीकडून एक लाख रुपयांचा चेक घेतला होता. मात्र ज्यांच्याकडून चेक घेतला त्यांच्यासोबत शेडचे अ‍ॅग्रीमेंट तयार करावयाचे नव्हते. घेतलेला एक लाखाचा चेक मी सदर व्यक्तीला परत करत होतो. मात्र सदर व्यक्ती आणि त्याचा भाऊ ते चेक परत घेत नव्हते़ मला जबरदस्ती करून दमबाजी करत होते. माझी हालत खराब होती म्हणून मी हा निर्णय घेतला’ असा उल्लेख या चिठ्ठीत आहे.बठेजा यांनी ज्या व्यक्तीकडून चेक घेतला आहे, त्याच्य व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला असून, त्याचा मोबाईल क्रमांकही लिहिलेला आहे. या घटनेबाबत तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत व्यक्तीच्या कुणी नातेवाईकांनी तक्रार दाखल केली, तर गुन्हा दाखल करणार असल्याचे तोफखाना पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस