अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने एसटीच्या प्रवासीसंख्येत वाढ झाली असून, पुणे, कल्याण आणि नाशिक बसेस हाउसफुल्ल आहेत. त्यामुळे अनलॉकनंतर जिल्ह्यातील बसेस सुसाट आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. बससेवा पूर्णपणे बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे अर्थचक्र बिघडले आहे. चालक व वाहनचालकांवर आर्थिक संकट कोसळले होते. दुसऱ्या लाटेनंतर अनलॉक झाल्यामुळे बससेवा हळूहळू पूर्व पदावर येत आहे. मागील महिन्यात नगर जिल्ह्यातील बसस्थानकातून ३२५ बसेस सुरू होत्या. प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागल्याने महामंडळाने फेऱ्या वाढविल्या असून, सध्या ३७० ते ३८० बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाची लाट ओसरल्याने प्रवासी बसला पसंती देत आहेत. त्यामुळे बसची प्रवासीसंख्या ५० हजार पार गेली आहे. नगर जिल्ह्यातून पुणे, कल्याण आणि नाशिक जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसला प्रतिसाद मिळत असून, बस हाउसफुल्ल आहेत. यातून एसटी महामंडळाला उत्पन्न मिळत असून, त्यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे.
.......
एकूण बसेस
५६५
....
सध्या सुरू असलेल्या बसेस
३८०
....
एकूण प्रवासीसंख्या
५३ हजार
.....
उभ्या असलेल्या बसेस
१८५
....
पुणे, कल्याण नाशिक मार्गावरील बसला गर्दी
कोरोनामुळे राज्यात निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. ५० टक्के प्रवासी प्रवेश करत आहेत. त्यामुळे गर्दी होत नाही. परंतु, पुणे, कल्याण आणि नाशिक मार्गावरील बसमध्ये गर्दी होत असून, नियमांचे पालन करून बसचा प्रवास सुरू आहे.
.....
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून बससेवा सुरू आहे. बस निरर्जंतुक करण्यात येत असून, प्रवाशांनाही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- विजय गिते, वाहतूक नियंत्रक
--
डमी क्रमांक-१०२५