शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावातून मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस बंद; मराठा आंदोलनाचा महामंडळाने घेतला धसका

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 30, 2023 13:41 IST

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग मराठवाड्यात सर्वाधिक आहे.

सचिन धर्मापुरीकर

कोपरगाव (जि. अहमदनगर) : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग मराठवाड्यात सर्वाधिक आहे. तेथे काही प्रमाणात एसटी बसेसवर दगडफेक झाली. त्यामुळे नुकसान होऊ नये, म्हणून कोपरगाव आगारातून मराठवाड्यात व मराठवाड्यातून विदर्भात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केले आहे. गावोगावी उपोषण व काही ठिकाणी उग्र आंदोलनेही होत आहेत. यातच मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत आंदोलकांनी परिवहन मंडळाच्या बसेसला लक्ष्य केले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोपरगाव आगारातून मराठवाड्यात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द केल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, सोमठाणा, जालना, माहूर, नांदेड या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एकुण दहा ते बारा फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख अमोल बनकर यांनी दिली. मराठवाड्यातून विदर्भात व हैदराबादला जाणाऱ्या बस देखील बंद केल्या आहेत. कुठलीही पूर्व कल्पना प्रवाशांना नसल्याने त्रास सहन करावा लागला. अनेक  प्रवाशी खासगी  वाहनातून जात होते.  काही जणांनी आपला प्रवास लांबणीवर टाकला आहे. अहमदनगर जिल्ह्यांतर्गत तसेच पुणे, मुंबई व इतर ठिकाणच्या बसेस सुरू आहेत.फोटो- कोपरगाव बस स्टँड