शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुरुडगावकरांनी अडविला शहराचा कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:33 IST

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे बुरुडगाव कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास मनाई असताना महापालिका कचरा आणत आहे. त्यामुळे बुरुडगाव येथील ग्रामस्थांकडून दोन दिवसांपासून कच-याची वाहने अडविण्यात आली आहेत. दरम्यान पोलीस बंदोबस्तात कचरा नेऊन वाहने अडविणा-यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

ठळक मुद्देमहापालिका घेणार पोलीस बंदोबस्तवाहने अडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

अहमदनगर : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे बुरुडगाव कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास मनाई असताना महापालिका कचरा आणत आहे. त्यामुळे बुरुडगाव येथील ग्रामस्थांकडून दोन दिवसांपासून कच-याची वाहने अडविण्यात आली आहेत. दरम्यान पोलीसबंदोबस्तात कचरा नेऊन वाहने अडविणा-यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.राष्ट्रीय हरित लवादाने दोन महिन्यांपूर्वी बुरुडगाव डेपोमध्ये अ‍ॅनिमल वेस्ट टाकण्यास मनाई केली आहे. मात्र सर्वच कचरा टाकण्यास मनाई केल्याचा दावा बुरुडगाव ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर बुरुडगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडे तक्रार करीत कचरा टाकण्यास मनाई केली आहे. महापालिकेची कचरा वाहून नेणारी वाहने दोन दिवसांपासून अडविण्यात आली आहेत.यामुळे वाहनांमधील कचरा वाहनातच असून शहरातील कचरा उचलला जात नसल्याने पुन्हा एकदा कच-याचे संकट येणार आहे. कचरा डेपोमुळे ग्रामस्थांना त्रास होत असून प्रदूषणही होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य संकटात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे ग्रामस्थ पालन करीत असून महापालिकेनेही पालन करावे, असे आवाहन भाऊसाहेब कुलट, राधाकिसन कुलट, उद्धव कुलट, आत्माराम कुलट यांनी केले आहे. याबाबत चौघांच्या सहीने जिल्हाधिकारी यांच्याकडेही निवेदन दिले आहे. दरम्यान कचरा वाहने अडविणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. एन. एस. पैठणकर यांनी दिला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशात बुरुडगाव डेपोत फक्त अ‍ॅनिमल वेस्ट टाकण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच खत प्रकल्पाच्या ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे तेथील खतप्रकल्प सुरू असल्याने त्रास होण्याचे कारण नाही, असे डॉ. पैठणकर यांनी स्पष्ट केले. 

घनकचरा व्यवस्थापन कोलमडले असून शहरातील कचरा संकलन करण्यात अडथळे येत आहेत. संपूर्ण कचरा विल्हेवाट करण्यासाठी वाहने आणि कर्मचारी अपुरे आहेत. सावेडी येथील कच-याचा प्रश्न मिटला असल्याने सावेडी उपनगरातील कच-याची विल्हेवाट सुरळीत होत आहे. मात्र बुरुडगाव कचरा डेपोत जाणारा कचरा अडविल्याने जुन्या शहरातील साचलेल्या कच-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात शहरात पुन्हा एकदा कच-याचे ढीग दिसणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका