चोरट्यांनी किराणा दुकान फोडले
अहमदनगर : शिर्डी येथील गणेशवाडी येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडून रोख २० हजार रुपये व किरणा माल असा एकूण ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २७ ते २८ जानेवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दिनेश लोकराज शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शिरसाठ हे पुढील तपास करत आहेत.
विहिरीतून वीजपंप चोरला
अहमदनगर: राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील शेतातील विहिरीतून चोरट्यांनी ८ हजार रुपयांचा वीजपंप चोरून नेला. २८ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी देविदास अगस्ती देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे पुढील तपास करत आहेत.