शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली

By admin | Updated: June 16, 2014 00:11 IST

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभा सुरू असताना सभागृहाबाहेर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर खाली पडून

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभा सुरू असताना सभागृहाबाहेर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर खाली पडून त्यामधून एक गोळी सुटली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र सभास्थळी झालेल्या या प्रकारामुळे एकच पळापळ झाली. या प्रकरणी संभाजी देवराम रोहोकले (वय ६१, रा. भाळवणी, ता. पारनेर) यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहोकले यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचे रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे.रेल्वे स्टेशन रोडवरील सहकार सभागृहात रविवारी दुपारी श्रद्धांजली सभा सुरू असताना दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. श्रद्धांजली सभा सुरू असताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे भाषण संपल्यानंतर ते दुपारी दीडच्या सुमारास सभागृहाबाहेर येत होते. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संभाजी रोहोकले हे विखे यांना भेटण्यासाठी सभागृहाबाहेर निघाले. यावेळी रोहोकले हे त्यांची पॅन्ट सावरत असताना कमरेच्या डाव्या बाजूला बेल्टला लावलेले आणि (पान ७)लोडेड असलेले रिव्हॉल्व्हर पाऊचमधून अचानकपणे फरशीवर पडले. त्यामधून एक गोळी सुटली आणि ती सभागृहाबाहेरील पोर्चच्या छताला लागली. सुदैवाने ही गोळी स्वत: रोहोकले यांना आणि पोर्चमध्ये थांबलेल्या कोणालाही लागली नाही. मात्र श्रद्धांजली सभा सुरू असताना सभागृहाबाहेर स्फोटासारखा आवाज आला. त्यामुळे सभागृहातील लोक घाबरून पळू लागले. एकच गोंधळ उडाला. प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी रोहोकले यांना सावरले तेंव्हा रोहोकले हे प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यांची चौकशी करून त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सभागृहाबाहेर असलेला गोंधळ कमी झाला.रोहोकले यांनी बाळगलेले रिव्हॉल्वर हे २००६ चे परवानाधारक असून ते त्यांनी अंबरनाथ येथून खरेदी केले होते. स्वसंरक्षणार्थ त्यांनी ते बाळगले होते. नेहमीच सहा राऊंड लोड करून ते वापरतात. श्रद्धांजली सभेच्या ठिकाणी येतानाही ते नेहमीप्रमाणे सहा राऊंड लोड करून सभागृहात आले होते. रिव्हॉल्वरमधून एक राऊंड फायर झाला होता. रोहोकले यांच्याकडील रिव्हॉल्वर आणि पाच राऊंड पोलिसांनी जप्त केले आहेत. (प्रतिनिधी)

निष्काळजीपणा भोवलाशासनाने परवाना दिल्यानंतर शस्त्राची योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र रोहोकले यांनी शस्त्र वापरताना कोणतीही काळजी घेतलेली नाही. लोकांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल,याची काळजी घेतलेली नाही. रिव्हॉल्वर हयगयीने वापरल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब निवृत्ती गडाख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात रोहोकले यांच्याविरुद्ध भादंवि कलम २८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, नितीन पगार, भरत जाधव, कॉन्स्टेबल मंगेश खरमाळे तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी वाय.डी. पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली.असे आहे रिव्हॉल्व्हररिव्हॉल्वरचा क्रमांक एनपीएपीएफ ३२ इंच, एमके-१ क्रमांक २९४४१०५ असा आहे. सहा बोअरचे ते रिव्हॉल्व्हर आहे. शासन परवाना क्रमांक २७५/पारनेर असा आहे. हे रिव्हॉल्वर त्यांनी अंबरनाथ येथून २००६ मध्ये खरेदी केले आहे. रिव्हॉल्वरची देखभाल केली जात नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.