शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

१५७ ग्रामपंचायतींच्या इमारती होणार चकाचक, शासनाकडून आता १०० टक्के निधी

By चंद्रकांत शेळके | Updated: December 11, 2023 21:18 IST

जिल्ह्यात १५७ ग्रामपंचायती इमारतीविना

अहमदनगर: गावचा कारभार हाकताना ग्रामपंचायतीला आपल्या कार्यालयासाठी प्रशस्त इमारत हवी असते. पूर्वी लहान ग्रामपंचायतींना निधीअभावी ही इमारत उभारताना अडचणी यायच्या. मात्र, आता राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस मुदतवाढ दिल्याने, तसेच यात स्वनिधीची अट रद्द केल्याने या ग्रामपंचायतींना लवकरच चकाचक इमारत मिळणार आहे. जिल्ह्यात अद्याप १५७ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. त्यांना हा फायदा होईल.

पूर्वी या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी, एक ते दोन हजार व दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी अनुक्रमे १२, १८ आणि १८ लाख रुपये मूल्य निर्धारित केले होते. तसेच १० ते २० टक्के एवढा निधी ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून उपलब्ध करून देण्याची तरतूद होती. बांधकाम मूल्य व स्वनिधीच्या अटीमुळे योजनेस अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे स्वनिधीची अट रद्द करण्यासह इमारत बांधकामास वाढीव अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.काय आहे बांधणी योजना?ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता बांधकामासाठी १०० टक्के अनुदान मिळणार आहे.

योजनेला मुदतवाढबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला पुढील चार वर्षे (२०२३-२४ ते २०२७-२८) मुदतवाढ देण्यात आली आहे.आधी किती मिळायचे अनुदान?पूर्वी या योजनेंतर्गत एक हजारपेक्षा कमी, एक ते दोन हजार व दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी अनुक्रमे १२, १८ आणि १८ लाख रुपये मूल्य शासनाने निर्धारित केले होते. त्यात १० ते २० टक्के म्हणजे दीड ते साडेतीन लाख एवढा निधी ग्रामपंचायतींना स्वनिधी म्हणून उपलब्ध करायचा होता.आता किती अनुदान मिळणार?२ हजारपेक्षा कमी लोकसंख्या - २० लाख रुपये२ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या - २५ लाख रुपयेजिल्ह्यात १५७ ग्रामपंचायती इमारतीविनाजिल्ह्यातील एकूण १३२० ग्रामपंचायतींपैकी १५७ ग्रामपंचायतींना इमारत नाही. यामुळे येथील ग्रामपंचायतींनी इमारत बांधकामासाठी शासनाकडे निधी मागितला आहे.शासनाने ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने व यात निधीही वाढवल्याने या ग्रामपंचायतींना प्रशस्त ग्रामपंचायत इमारत मिळेल.- दादाभाऊ गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरgram panchayatग्राम पंचायत