शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरच्या वाडिया पार्कमधील ‘ती’ इमारत अखेर जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 14:10 IST

अहमदनगरच्या वाडिया पार्क क्रीडा संकुलातील बी विंग इमारत महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमिनदोस्त केली. शनिवारी सकाळी आठच्या सुमारासच ही कारवाई करण्यात आली.

अहमदनगर : वाडिया पार्क क्रीडा संकुलातील बी विंग इमारत महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमिनदोस्त केली. शनिवारी सकाळी आठच्या सुमारासच ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे मागच्या रविवारी याच इमारतीचा काही भाग पाडण्यात आला होता. परंतु ठेकेदाराने न्यायालयाचा स्थगिती आदेश सादर केल्याने ही कारवाई थांबवण्यात आली होती. वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात ठेकेदाराने अनधिकृत इमारत बांधून त्यात गाळे काढले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे नुकताच मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार आला असून त्यांनी मागील रविवारी ही अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश दिले. त्यामुळे मनपाने ही इमारत पाडण्यास सुरूवात केली. परंतु बांधकाम विकासक जवाहर मुथा यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्याला स्थगिती आदेश असल्याचे मनपाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी (दि. १४) सकाळी आठ वाजताच मनपाने पुन्हा ही कारवाई सुरू केली. मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन मनपाचे अतिक्रमणविरोध पथक ही इमारत पाडण्यासाठी दाखल झाले. दरम्यान, विकासकाने पुन्हा मनपाला कारवाई थांबवण्याबाबत सांगितले. मात्र ही कारवाई पूर्ण करण्यात आली. या कारवाईसंदर्भात अवमान याचिका दाखल केलेली आहे. शिवाय अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भातही काही याचिका दाखल झाल्या आहेत. औरंगाबाद खंडपीठात १० डिसेंबरला यासंदर्भात सुनावणी झाली. मात्र यात कोणताही आदेश झाला नसल्याने मनपाने ही कारवाई केली. पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार असल्याचे समजते. काय आहे पेचवाडिया पार्क मैदान हे क्रीडा संकुल समितीला नगरपालिका असताना देण्यात आले आहे.  मैदानाचे बांधकाम बीओटी तत्त्वावर विकासक जवाहर मुथा यांना देण्यात आले होते. हे काम अद्यापही अपूर्णच आहे. या मैदानाबाहेर ए व बी अशा दोन इमारती बांधण्यात आल्या असून त्या अतिक्रमणात असल्याचे मनपाचे म्हणणे आहे. न्यायालयाच्या आदेशाने मनपाने यातील ए विंगला सील ठोकलेले आहे. मागील पाच वर्षांपासून हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर