शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यात संपत्तीसाठी भावानेच केला चिमुकल्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:43 IST

संपत्तीसाठी मोठ्या भावानेच चिमुकल्या भावाचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील भाऊ, भावजय व सासूला पोलीसांनी गुरुवारी (८ जानेवारी) अटक केली आहे.

ठळक मुद्देभाऊ, भावजय व सासूचा प्लॅनतीन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा : संपत्तीसाठी मोठ्या भावानेच चिमुकल्या भावाचा खून केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथील भाऊ, भावजय व सासूला पोलीसांनी गुरुवारी (८ जानेवारी) अटक केली आहे. लालासाहेब बापू पारखे (वय - २७ वर्षे) व काजल लालासाहेब पारखे ( वय - २१ वर्षे ) या दोघांनी संगीता अंकुश वरपे (लालासाहेब पारखे याची सासू ) या तिघांना अटक केली आहे. लालासाहेब पारखे याने खुनाची कबुली दिली आहे. ५ वर्षाच्या बाल्या उर्फ वैभव बापू पारखे याचा खून १३ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला होता.याबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ नोव्हेंबर २०१७ रोजी वैभव बापू पारखे हा घरातून गायब झाला होता. याप्रकरणी दुपारी अपहरण झाल्याची फिर्याद वडील बापू पारखे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिली होती.  त्यानंतर तब्बल तेरा दिवसांनी चिमुकल्या वैभवचा मृतदेह घराच्या बाजुलाच सापडला. तपासादरम्यान संपत्तीसाठी वैभवचा खून भाऊ - भावजय व सासूने केल्याचे उघड झाले आहे. वैभवचा मोठा भाऊ लालासाहेब बापू पारखे (वय - २७ वर्षे) व काजल लालासाहेब पारखे ( वय - २१ वर्षे ) या दोघांनी संगीता अंकुश वरपे (लालासाहेब पारखे याची सासू ) हिच्या सांगण्यावरून दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले. वैभवच्या तीनही मारेक-यांना पोलीसांनी अटक केली आहे. लालासाहेब पारखे याने खूनाची कबुली दिली आहे. तुम्हाला जमीन कमी असल्यामुळे लहान भावाला संपविण्याचे सासूने सांगितल्याचेही त्याने पोलीस तपासात सांगितले. त्यानुसार लालासाहेब व त्याची पत्नी काजल या दोघांनी वैभवचा खुन करण्याचा प्लॅन केला. १३ नोव्हेंबर रोजी वैभव शाळेतून घरी आला होता. त्यानंतर दुपारी झोपेत असताना दोघांनी वैभवचा खून करुन प्रेत घरामागील काटवनात फेकून दिले. रक्तमय झालेले कपडे अर्धवट स्थितीत जाळून खड्ड्यात पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जमिनीच्या हिस्यावरुन हा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी या खूनाचा छडा लावला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा